घरक्रीडाIND vs WI 2nd Test : वेस्ट इंडिज सर्वबाद ३११, पृथ्वीचे पुन्हा...

IND vs WI 2nd Test : वेस्ट इंडिज सर्वबाद ३११, पृथ्वीचे पुन्हा एक अर्धशतक

Subscribe

भारत विरुद्द वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना सध्या हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या पहिल्याच सत्रात भारताने वेस्ट इंडिजचा डाव ३११ धावांवर आटोपला. उमेश यादवच्या गोलंदाजीवर पंतने शनॉनला झेलबात करत विंडिजला ऑल आऊट केले. काल ९८ धावांवर नाबाद राहिलेल्या रोस्टन चेसने त्याचे शतक आज पूर्ण केले. परंतु शतकानंतर त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. १०६ धावांवर तो बाद झाला. सकाळच्या पहिल्या सत्रात उमेश यादवने विंडिजचे ३ गडी बाद केले. भारतातर्फे उमेश यादवने भारतातर्फे सर्वाधिक ६ गडी बाद केले.


विंडीजला ऑल आऊट केल्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताने जलद सुरूवात केली. नवोदित पृथ्वी शॉने तुफान फटकेबाजी करत अवघ्या ४० चेंडूत अर्धशतकी खेळी केली. तर, लोकेश राहुल केवळ 4 धावांवर बाद झाला. मात्र, पृथ्वीच्या सुरेख खेळामुळे भारत दमदार स्थितीत पोहोचला आहे. लोकेशनंतर चेतेश्वर पुजारा मैदानात उतरला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -