घरक्रीडाIND vs WI ODI : 'तो' सामना ब्रेबॉनवरच होणार - कोर्ट

IND vs WI ODI : ‘तो’ सामना ब्रेबॉनवरच होणार – कोर्ट

Subscribe

वेस्ट इंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये एक कसोटी मालिका खेळवण्यात आली असून भारताने ती जिंकली होती. आता दोन्ही संघांमध्ये पाच वन डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यापैकी चौथा वन डे सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता. परंतु हा सामना बीसीसीआयने ब्रेबॉर्न स्टेडियमवर स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यावर नाराज झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात बीसीसीआयच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली. यावर तूर्तास कोणतेही आदेश देण्यास इच्छुक नसल्याचे सांगत उच्च न्यायालयाने प्रतिवादींना आठवड्याभरात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली होती.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात २९ ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमवर एकदिवसीय सामना होणार होता. तो आता ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती वारंवार एमसीएकडून करण्यात आली. मात्र हायकोर्टाने नेमून दिलेल्या दोन निवृत्त न्यायाधीशांनी तिथे काम करण्यास इच्छुक नसल्याचे न्यायालयाला कळवले आहे. मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडिज सामन्याच्या तिकीटविक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. २९ ऑक्टोबरला होणाऱ्या या सामन्यासाठी गुरुवारपासून तिकीटविक्री सुरु होणार आहे.

- Advertisement -

आम्हाला विश्वासात न घेता बीसीसीआयने निर्णय घेतल्याचा आरोप एमसीएने हायकोर्टात केला होता. तसेच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) हा एक क्रिकेट क्लब असून ती थेट बीसीसीआयशी संलग्न संस्था नाही. त्यामुळे एमसीएला विश्वासात न घेता तिथे सामना खेळवणे अयोग्य असल्याचा दावाही एमसीएकडून करण्यात आला होता. परंतु न्यायालयाने एसीएची याचिका फेटाळली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -