घरक्रीडाIND Vs WIN 2nd ODI Live: सामना झाला टाय!

IND Vs WIN 2nd ODI Live: सामना झाला टाय!

Subscribe

भारत आणि वेस्ट इंडिज उभय संघातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा वन डे सामना आज विशाखापट्टणम येथे सुरू झाला आहे. दुपारी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात वरचढ वाटलेल्या भारतीय संघाची दुसऱ्या सामन्यात अडखळत सुरूवात झाली. परंतु कर्णधार विराट कोहलीच्या दिडशतकाच्या जोरावर भारताने ३२१ धावांचा डोंगर उभा केला. त्यास विंडीजच्या संघाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. थरारक झालेला सामना बरोबरीत सुटला. विंडिजच्या संघानेदेखील ३२१ धावा केल्या. विंडीजच्या शाय होपने १२३ धावा करत एकहाती किल्ला लढवला. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता असताना त्याने चौकार खेचला. त्यामुळेच हा थरारक सामना टाय झाला आहे.

- Advertisement -


 

- Advertisement -

भारताने रचलेल्या ३२१ धावांच्या डोंगराला वेस्ट इंडिजच्या संघाने चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. विंडिजने ३ गड्यांच्या मोबदल्यात १५६ धावा केल्या आहेत. विंडीजचा सलामीवीर पॉवेल ३४ धावांवर बाद झाल्यानंतर पुढे शाय होप (नाबाद ३८) आणि शिम्रॉनच्या अर्धशतकाने तारले आहे.

Virat Kohli
भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने वनडे मध्ये सर्वात जलद १०००० धावा केल्या.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघांमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीचे दिडशतक आणि अंबाती रायुडूच्या ७३ धावांच्या जोरावर भारताने ३२१ धावांचा डोंगर रचला आहे.

विराट कोहली

विराट कोहली

 


वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शतक पूर्ण केले आहे. विराटचे हे कारकिर्दीतले ३७ वे शतक ठरले आहे. विराटने १०५ चेंडूत शतक साजरे केले. विराट सध्या १०९ धावांवर खेळत आहेत. त्याच्या या शानदार खेळीत त्याने १० चौकार लगावले आहेत.

विराट कोहली

विराट कोहलीने आज ८० धावा पूर्ण केल्यानंतर त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतल्या १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत.


 

दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार विराट कोहली आणि अंबाती रायुडूवर दबाव आला होता. परंतु दोघांनीही शानदार अर्धशतके झळकावली. ७३ धावांवर असताना रायुडूला अॅशले नर्सने त्रिफळाचित केले. कर्णधार विराट कोहली ७३ धावांवर खेळत असून त्याची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. रायुडूने ८० चेंडूत ८ चौकारांसह ७३ धावा केल्या.

अंबाती रायुडू (सौजन्य – डीएनए)

अडखळत सुरुवात झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार विराट कोहलीने सामन्याची सुत्रे हाती घेतली. सावधपणे खेळत विराटने स्वतःचे अर्धशतक आणि संघाचे शतक फलकावर लावले आहे. विराटने ५९ चेंडूत ५२ धावा पूर्ण केल्या असून भारताच्या फलकावर १३६ धावा झाल्या आहेत.

भारताने ४० धावांच्या आतच दोन्ही सालामीवीर गमावले आहेत. चौथ्या षटकात सलामीवीर रोहित शर्मा केमर रोचच्या गोलंदाजीवर बेजबाबदार फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. हेटमायरने रोहितचा झेल टिपला. अवघ्या चार धावा करून रोहित बाद झाला. नवव्या षटकात शिखर धवन २९ धावांवर अॅशले नर्सच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.


रोहितपाठोपाठ शिखर धवननेदेखील नांगी टाकली

रोहित शर्मा झटपट बाद

विराट कोहली (सौजन्य – क्रिकइन्फो)

भारत आणि वेस्ट इंडिज उभय संघातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा वन डे सामना आज विशाखापट्टणम येथे सुरू झाला आहे. दुपारी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात वरचढ वाटलेल्या भारतीय संघाची दुसऱ्या सामन्यात अडखळत सुरूवात झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -