घरक्रीडाभारत जिंकणार की न्यूझीलंड रोखणार ?

भारत जिंकणार की न्यूझीलंड रोखणार ?

Subscribe

तिसरा एकदिवसीय सामना आज

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना सोमवारी होणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकलेल्या भारताला हा सामना जिंकत ही मालिका जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे न्यूझीलंडला या मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवायचे असेल तर हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने या मालिकेत खूप चांगले प्रदर्शन केले आहे आणि आता पांड्याच्या समावेशाने संघ अधिकच मजबूत होईल.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यात 3 टी-20, 4 कसोटी, 3 एकदिवसीय आणि त्यापाठोपाठ न्यूझीलंडमध्ये 2 एकदिवसीय सामने खेळणारा भारताचा कर्णधार विराट कोहलीला तिसर्‍या सामन्यानंतर विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून या दौर्‍याचा शेवट करण्याचे त्याचे लक्ष्य असेल. तिसर्‍या सामन्यात विजय शंकर ऐवजी हार्दिक पांड्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. शंकरला पहिल्या दोन्ही सामन्यांत आपली प्रतिभा दाखवण्याची फारशी संधी मिळाली नाही. त्याने पहिल्या सामन्यात 4 तर दुसर्‍या सामन्यात 2 षटके टाकली, तर दोन्ही सामन्यांत त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. मात्र पांड्याच्या एकहाती सामना जिंकवून देण्याच्या क्षमतेमुळे शंकरला आपले संघातील स्थान गमवावे लागू शकते.

- Advertisement -

या मालिकेच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्या फिरकीने न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत टाकले. या दोघांनी मिळून 2 सामन्यांत 12 विकेट घेतल्या आहेत. या मालिकेत न्यूझीलंडकडून केन विल्यम्सन आणि डग ब्रेसवेल या दोघांनाच अर्धशतक करण्यात यश आले आहे. त्यामुळे न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी त्यांच्या फलंदाजांनी आपले प्रदर्शन सुधारण्याची गरज आहे.

तसेच भारताच्या फलंदाजांनीही दोन्ही सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. महेंद्रसिंग धोनीवर मागील काही काळात अखेरच्या षटकांत फटकेबाजी करता न आल्याने बरीच टीका झाली आहे. मात्र त्याने ऑस्ट्रेलियापाठोपाठ न्यूझीलंडविरुदद्धच्या दुसर्‍या सामन्यातही चांगली कामगिरी केली. त्याने या सामन्यात अवघ्या 33 चेंडूंत 48 धावा केल्या. त्यामुळेच तिसर्‍या सामन्यातही भारताचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे न्यूझीलंडला हा सामना जिंकणे सोपे जाणार नाही. मात्र त्यांना आपले या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवायचे असेल तर त्यांना हा सामना जिंकण्याशिवाय पर्याय नाही.

- Advertisement -

सामन्याची वेळ – सकाळी 7:30 पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -