घरक्रीडाभारत-पाक सामना ड्रॉ, पण मनप्रीतच्या 'या' हुशारीमुळे कप भारताकडेच!

भारत-पाक सामना ड्रॉ, पण मनप्रीतच्या ‘या’ हुशारीमुळे कप भारताकडेच!

Subscribe

भारत-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवारी रात्री भिडणार होते. या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेची अंतिम लढाई होणार होती. परंतु पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

भारत-पाकिस्तान सामना म्हटले की, दोन्ही देशांतील नागरिकांसाठी प्रतिष्ठेची लढत असते. दोन्ही देशांत या सामन्यांबाबत विशेष कुतुहल पहायला मिळते. हे पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवारी रात्री भिडणार होते. या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेची अंतिम लढाई होणार होती. परंतु पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. रात्री उशीरापर्यंत प्रतीक्षा करुनही पावसाचा जोर कायम राहिल्याने दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. परंतु, यावेळी मनप्रीत सिंगने मोठ्या चतुराईने विजेतेपदाचा चषक भारताकडेच राहील याची काळजी घेतली. त्याच्या या स्मार्ट खेळीचे सोशल मीडियावर नेटिजन्सनी कौतुक केले आहे.

- Advertisement -

वाचा – प्रवाशांनी भरलेले विमान कोसळले

तिसऱ्यांदा विजेतेपद हवे होते

ओमान येथे आशियाई हॉकी महासंघाने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी प्रत्येकी दोन वेळा ही अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. भारताने २०११ आणि २०१६ साली पाकिस्तानला नमवून जेतेपदाचा मान पटकावला होता. पाकिस्तानने २०१२ व २०१३ विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे काल यंदाचा अंतिम सामना जिंकून तिसऱ्यांदा चषक आपल्या नावे करण्याचा मानस घेऊन दोन्ही संघ पूर्ण तयारीनिशी स्टेडियममध्ये दाखल झाले. परंतु पावसाने दोन्ही संघ आणि देशातील नागरिकांचा हिरमोड केला.

- Advertisement -

मनप्रीतच्या हुशारीमुळे चषक भारताकडेच

आशियाई हॉकी महासंघाने पवसामुळे सामन्याची वेळ पुढे ढकलली. परंतु दीड तास वाट पाहूनही पाऊस थांबला नाही. त्यामुळे महासंघाने दोन्ही संघाना संयुक्त विजेते घोषित केले. मात्र मनप्रीतच्या एका हुशारीमुळे विजेतेपदाचा चषक भारताकडेच राहिला. चषकासोबत दोन्ही संघ फोटो काढण्यासाठी मैदानावर आले त्यावेळी मनदीप आणि मनप्रीत हे दोघेही चषकाभोवती ठाण मांडून बसले. मनप्रीतने पाकिस्तान संघाच्या चमूत जात चषका शेजारील जागा मिळवली. त्यामुळे चषकाच्या दोन्ही बाजुला भारतीय खेळाडुंना जागा मिळाली. त्यानंतर चषकासह जे फोटो काढले त्या फोटोंमध्येदेखील असे दिसत आहे की चषक भारतानेच पटकावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -