पहिल्या टी-२० साठी भारतीय संघ जाहीर, कृणालच्या पदार्पणाची शक्यता

पहिल्या टी-२० सामन्यात कृणाल पांड्या पदार्पण करण्याची शक्यता आहे.

Kolkata
कृणाल पांड्या

कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकणाऱ्या भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी आपल्या १२ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये अष्टपैलू कृणाल पांड्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तो या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. तसेच महेंद्रसिंग धोनीला या मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. त्याच्याजागी रिषभ पंत यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच एकदिवसीय मालिकेत संधी न मिळालेले लोकेश राहुल आणि मनीष पांडे यांनाही या सामन्यात संधी मिळणार आहे.

भारताचा १२ जणांचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), मनिष पांडे, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, युझवेंद्र चहल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here