घरक्रीडाऑस्ट्रेलियामध्ये भारताचा ऐतिहासिक विजय!!

ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा ऐतिहासिक विजय!!

Subscribe

पहिल्या कसोटीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला धुळ चारली आहे. अॅडलेडमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा ....धावांनी पराभव केला आहे.

पहिल्या कसोटीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला धुळ चारली आहे. अॅडलेडमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव केला आहे. भारतानं दिलेल्या ३२३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २९१ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या फलंदाजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण, त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. भारताचा हा एेतिहासिक विजय आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतानं १-० अशी आघाडी घेतली आहे.  पहिल्या डावामध्ये देखील भारतानं १५ धावांची आघाडी घेतली होती. भारतीय फलंदाजांना गोलंदाजांनी देखील उत्तम साथ दिल्यानं भारतानं अखेर कांगारूंना पहिल्या कसोटीमध्ये धुळ चारलेली आहे. पहिल्या डावामध्ये भारतानं २५० धावा केल्या. पण, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव मात्र २३५ धावांमध्ये आटोपला. त्यामुळे भारताला १५ धावांची आघाडी मिळाली. पहिल्या डावामध्ये बुमरानं ३, आर. अश्विननं ३, इशांत शर्मानं २ आणि मोहम्मद शमीनं २ गडी बाद केले. भारताकडून खेळताना पहिल्या डावामध्ये चेतेश्वर पुजारानं सर्वाधिक १२३ धावा केल्या. भारताच्या २५० धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले.

दुसऱ्या डावामध्ये देखील चेतेश्वर पुजारानं ७१ आणि अजिंक्य रहाणेनं सर्वाधिक ७३ धावा केल्या. दोन्ही डावांमध्ये कर्णधार विराट कोहली मात्र अपेक्षित अशी कामगिरी करू शकलेला नाही. दुसऱ्या डावामध्ये देखील मोहम्मद शमी आणि जसप्रित बुमरानं प्रत्येकी ३ गडी टिपले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -