घरक्रीडाICC Women’s T-20 World Cup : आयर्लंडवरील विजयाने भारत उपांत्य फेरीत

ICC Women’s T-20 World Cup : आयर्लंडवरील विजयाने भारत उपांत्य फेरीत

Subscribe

भारताने महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडवर ५२ धावांनी मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने आयर्लंडवर ५२ धावांनी विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर भारताने सरळ उपांत्य फेरीत प्रवेश केला. याआधीच्या दोन सामन्यांत भारताने न्यूझीलंडवर ३४ धावांनी तर पाकिस्तानवर ७ विकेट ठेवून मात केली होती.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून सर्वप्रथम आयर्लंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला मिताली राज आणि स्मृती मानधनाकडून चांगली सुरूवात मिळाली. दोघींनी मिळून ६७ धावांची भागीदारी केली. ३३ धावा करून स्मृती बाद झाली. त्यानंतर भारताला कोणताही मोठी भागीदारी लाभली नाही. ड्रीग्जने १८ आणि दीप्ती शर्माने ११ धावा केल्या. पण दुसऱ्या बाजुने मितालीने एकाकी झुंज अर्धशतकी खेळी खेळून भारताला ६ बाद १४५ धावांपर्यंत पोहोचवले. तिने ५६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारसह ५१ धावा केल्या. तिचे हे सलग दुसरे अर्धशतक होते. पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यातही तिने अशीच कामगिरी केली होती. हे तिचे आंतरराष्ट्रीय टी-२० मधील हे १७ वे अर्धशतक ठरले.

- Advertisement -

या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडची सलामीवीर गॅबी लुईस अवघ्या ९ धावांवर बाद झाली. शिलिंगटनच्या २३ धावांमुळे आयर्लंडच्या आशा परतल्या होत्या, पण भारतीय गोलंदाजांसमोर त्या फार काळ टिकल्या नाहीत. जॉयस देखील ३३ धावांवर तंबूत परतली. आयर्लंडच्या अखेरच्या पाच फलंदाजांनी धावफलकावर फक्त ९ धावा लावल्या. त्यामुळे आयर्लंडला आपल्या २० षटकांत ८ बाद ९३ इतकीच धावसंख्या गाठता आली. भारताकडून स्पिनर राधा यादवने ३ बळी तर दिप्ती शर्मा हिने २ बळी घेतले.

शनिवारी १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शेवटच्या गट सामन्यात भारत ऑस्ट्रेलिया विरूध्द खेळणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघेही आत्तापर्यंत या स्पर्धेत अपराजित असून ते उपांत्य फेरीत दखल झाले आहेत. हे दोन्ही संघ शनिवारी गटातील अव्वल स्थानासाठी झुंजणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -