घरक्रीडाभारताचा आयर्लंडवर रेकॉर्डब्रेक विजय

भारताचा आयर्लंडवर रेकॉर्डब्रेक विजय

Subscribe

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय टीमनं परत एकदा इतिहास रचला आहे. आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी - २० मॅचमध्ये शानदार कामगिरी करत भारतीय टीमनं १४३ रन्सनं आयर्लंडला हरवून रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी – २० मॅचमध्ये शानदार कामगिरी करत भारतीय टीमनं १४३ रन्सनं आयर्लंडला हरवून रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. यापूर्वी भारतानं श्रीलंकेला ९३ धावांनी हरवून इतिहास रचला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय टीमनं परत एकदा इतिहास रचला आहे. सुरेशा रैना आणि आणि सलामीवीर लोकेश राहुल यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाला हा विजय मिळवता आला आहे. तर कप्तान विराट कोहलीला आता टी – २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० रन्स बनवण्यासाठी केवळ १७ रन्सची गरज आहे.

आयर्लंडनं जिंकला होता टॉस

आयर्लंडनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सलामीला लोकेश राहुल बरोबर आलेला विराट कोहली केवळ ९ रन्स काढून परतला. तर लोकेश राहुलनं धडाकेबाज ७० धावांची खेळी करत रैनाच्या (६९ रन्स) साथीनं १०६ धावांची भागीदारी करत आयर्लंडसमोर २१३ रन्सचा डोंगर उभा केला. यापेक्षाही अधिक रन्स होतील अशा अपेक्षा असतानाच केविन ओब्रायननं शेवटी ३ विकेट्स घेत भारतीय टीमला धक्का दिला. मागच्या मॅचमध्ये ९७ रन्सची खेळी करणारा रोहित शर्मा मात्र यावेळी खातंही उघडू शकला नाही. तर हार्दिक पंड्यानं सिक्सचा पाऊस पाडत शेवटी ९ बॉल्समध्ये चार सिक्स आणि एक फोर मारत ३२ रन्स घेतल्या. भारताने दिलेल्या २१३ रन्सचा पाठलाग करताना आयर्लंडची टीम मात्र केवळ १२.३ ओव्हर्समध्ये ७० रन्सवर गारद झाली. आयर्लंडच्या टीममधील सातही बॅट्समन दहाचा आकडादेखील पार करू शकले नाहीत. केवळ कप्तान गॅरी विल्सननं सर्वात जास्त अर्थात १५ रन्स करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न भारताचे बॉलर कुलदीप आणि चहल या दोघांनीही हाणून पाडत १४३ रन्सने भारताला विजय मिळवून दिला. दोघांनीही प्रत्येकी ३ -३ विकेट्स घेतल्या. तर उमेश यादवनं दोन बॅट्समनना आऊट केलं. याशिवाय पहिल्यांदाच मॅचमध्ये खेळणाऱ्या सिद्धार्थ कौलला एक विकेट घेण्यात यश मिळालं.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –

भारत – २० ओव्हर्स – ४ बाद २१३ रन्स
आयर्लंड – १२.३ ओव्हर्स – सर्व बाद ७० रन्स
१४३ धावांनी आयर्लंडवर भारताची मात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -