घरक्रीडाभारत-कोरिया सामना बरोबरीत

भारत-कोरिया सामना बरोबरीत

Subscribe

सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताचा दुसरा सामना बरोबरीत संपला. दक्षिण कोरियाने अखेरच्या क्षणी गोल करत भारताला १-१ असे बरोबरीत रोखले. भारताने या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात एशियाड विजेत्या जपानला २-० असे पराभूत केले होते.

दोन्ही संघांना पहिल्या सत्रात गोल करण्यात अपयश आले. मात्र, दुसर्‍या सत्राच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच मनदीप सिंगने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत भारताने आपली आघाडी कायम राखली. तिसर्‍या सत्रात द. कोरियाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी मिळाली, मात्र भारताने भक्कम बचाव करत आपली आघाडी कायम राखली.

- Advertisement -

अखेरच्या सत्रात खराब हवामानामुळे सामना मध्येच थांबवण्यात आला. मात्र, अखेरच्या काही मिनिटांमध्ये कोरियन खेळाडूंनी भारतावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. यातील दुसर्‍या कॉर्नरवर कोरियाच्या जँग जाँगह्यूनने गोल करत द.कोरियाला १-१ अशी बरोबरी करून दिली. हा सामना याच स्कोरने संपला. आता या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना मंगळवारी यजमान मलेशियाविरुद्ध होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -