घरक्रीडापहिल्या वनडे सामन्यात भारताचा पराभव

पहिल्या वनडे सामन्यात भारताचा पराभव

Subscribe

सलामवीर रोहित शर्माने १३३ धावा केल्या. परंतु, त्याची विक्रमी खेळी निष्फळ ठरली.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात आज भारताचा ३४ धावांनी पराभव झाला आहे. त्यामुळे या तीन सामन्यांच्या मालिकेत आस्ट्रेलियाने १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यामध्ये सलामवीर रोहित शर्माने १३३ धावांची विक्रमी खेळी केली. परंतु, त्याची खेळी निष्फळ ठरली. भारताचा या पहिल्या सिडनी सामन्यात भारताचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने भारताला २८९ धावांचे आव्हान दिले होते. परंतु, कांगारुंच्या गोलंदाजीवर भारताची फलंदाजी पुरती कोलमडली. भारताने ५० षटकांमध्ये ९ गाड्यांच्या मोबदल्यात २५४ धावा केल्या.

हेही वाचा – ‘त्या’ विधानाबद्दल हार्दिक पांड्याचा माफिनामा

- Advertisement -

अशी होती ऑस्ट्रेलियाची इनिंग

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला नाणेफिक जिंकूण फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. कर्णधार फिंच याचा त्रिफळा उडाला. परंतु, यानंतर उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि पीटर हॅंडस्कॉंब यांनी एकामागोमाग एक अर्धशतक करत संघाचा डाव सांभाळला. ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ५ गडी राखत २८८ धावा केल्या. भारतीय संघाचे कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी २-२ बळी घेतले. रविंद्र जडेजाने १ बळी घेतला. तर मोहम्मद शमीने १० षटकात ४६ धावा दिल्या.

भारताची सुरवातच गंडली

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २८९ धावांचे आव्हान दिले होते. परंतु, भारताची सुरुवातच गंडली. शिखर, विराट आणि रायडू हे लवकर माघारी परतले. सलामवीर रोहित शर्माने संघाचा डाव सांभाळण्याचा फार प्रयत्न केला. परंतु, जोडीदाराची साथ मिळाली नाही. धोनीच्या साथीने भारताचा डाव सावरला. रोहित शर्माने सतक केले. धोनीने अर्धशतक केले. परंतु, धोनी आऊट झाल्यानंतर पुन्हा भारतीय सामनाला उतरती कळा लागली. अखेर, ५० षटकांमध्ये भारताचे २५४ धावा झाल्या आणि भारताचा ३४ धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या रिचर्डसनने ४, बेहरनडॉर्फनने २ बळी घेतले तर पिटर सिडल आणि स्टॉयनिसने प्रत्येकी १-१ बळी घेतले.

- Advertisement -

हेही वाचा – हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलवर निलंबनाची कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -