घरक्रीडाकुलचाशिवाय भारताने आक्रमक फलंदाजी करणे गरजेचे!

कुलचाशिवाय भारताने आक्रमक फलंदाजी करणे गरजेचे!

Subscribe

कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल ही फिरकी जोडगोळी भारतीय क्रिकेटमध्ये कुलचा या नावाने ओळखली जाते. या दोन्ही फिरकीपटूंनी मागील काही वर्षांत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. मात्र, त्यांची सलग दोन टी-२० मालिकांसाठी भारतीय संघात निवड झालेली नाही. नुकत्याच झालेल्या विंडीज आणि सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवड समितीने त्यांच्या जागी राहुल चहर आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. चहर आणि सुंदर फलंदाजीही करण्यात सक्षम आहेत. त्यांच्या समावेशाने भारताची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे भारताने टी-२० क्रिकेटमध्ये सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करणे गरजेचे आहे, असे भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राला वाटते.

गोलंदाज जे फलंदाजी करू शकतात त्यांना भारतीय संघ संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची विशिष्ट पद्धतीने फलंदाजी करण्याची कल्पना आहे. तुमच्याकडे इतके फलंदाज असतील, तर तुम्ही सावधपणे फलंदाजी करता कामा नये. इंग्लंडने हेच केले. त्यांच्या संघात बरेच अष्टपैलू असल्याने त्यांनी आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली. त्यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४०० धावांचा टप्पा सातत्याने पार करायचा होता आणि त्यात त्यांना यशही आले. भारताला टी-२० मध्ये आक्रमकपणे फलंदाजी करायची आहे आणि यात काहीच चूक नाही.

- Advertisement -

कुलदीप आणि चहलला वगळून त्यांनी गोलंदाज जे फलंदाजी करू शकतात, त्यांना संघात स्थान दिले. भारताला जर आठव्या, नवव्या क्रमांकापर्यंत फलंदाज हवे असतील, तर त्यांनी सातत्याने २२० धावांचा टप्पा पार केला पाहिजे. चहल या संघात परतेल याची मला खात्री आहे. राहुल चहर गोलंदाज आहे, जो फलंदाजी करू शकतो. परंतु, सुंदरच्या फलंदाजीची कदाचित भारताला गरज नाही, असे चोप्रा म्हणाला.

दोघांनी स्थानिक क्रिकेट खेळावे! -जोशी

- Advertisement -

टी-२० क्रिकेटमध्ये युवा फिरकीपटूंना संधी देण्याचा भारताचा निर्णय योग्यच आहे, असे भारताचे माजी फिरकीपटू सुनील जोशी यांचे मत आहे. त्यांनी याबाबत सांगितले, कुलदीप आणि चहल यांनी स्थानिक क्रिकेट खेळले पाहिजे असे मला वाटते. युवा फिरकीपटूंना संधी देण्याचा निर्णय योग्यच आहे. आता ते कशी कामगिरी करतात ते पाहावे लागेल. मात्र, कुलदीप आणि चहल हे क्रिकेटच्या एकाच प्रकारात खेळत असतील, तर त्यांची लय बिघडण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रत्येक फिरकीपटूला त्यांची भूमिका काय असणार हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -