भारत वि.विंडीज मालिका

Mumbai
पोलार्ड, रसल विंडीजच्या ताफ्यात

भारतीय संघाविरुद्ध विंडीजचा टी २० संघ जाहीर करण्यात आला. या संघात विंडीजच्या धडाकेबाज फलंदाजांचा भरणा आहे. भारतीय वेळेनुसार मंगळवारी पहाटे विंडीजने संघ जाहीर केला. या संघात कायरन पोलार्ड, आंद्रे रसल, कार्लोस ब्रेथवेट, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर यासारख्या धडाकेबाज फलंदाजांना संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय विंडीजच्या संघात फिरकीपटू सुनील नरिन याचेही पुनरागमन झाले आहे.

३ ऑगस्टपासून विंडीज विरुद्ध भारत या टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांसाठी विंडीजच्या संघाची निवड करण्यात आले आहे. या २ सामन्यांसाठी कायरन पोलार्ड आणि सुनील नरिन या दोघांचे संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेला आंद्रे रसलदेखील संघात आहे. विंडीज क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार यष्टीरक्षक फलंदाज अँथनी ब्रॅम्बल हा १४ खेळाडूंच्या चमूतील नवा खेळाडू आहे. विंडीजच्या देशांतर्गत स्पर्धेत त्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर त्याला या संघात स्थान मिळाले आहे.

विंडीजचा टी- २० संघ – कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, एव्हिन लुईस, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, कायरन पोलार्ड, रोव्हमन पॉवेल, कीमो पॉल, सुनील नरिन, शेल्डन कॉट्रेल, ओशेन थॉमस, अँथनी ब्रॅम्बल, आंद्रे रसल, खरी पिअर