घरक्रीडाइंग्लंडविरुद्ध वनडेसाठी विराटसमोर नवं आव्हान

इंग्लंडविरुद्ध वनडेसाठी विराटसमोर नवं आव्हान

Subscribe

गुरुवारपासून भारत आणि इंग्लंडमध्ये वनडे मॅच सुरु होत आहेत. भारत कितीही फॉर्ममध्ये असला तरीही विराटसमोर मात्र जिंकण्यासाठी आव्हान निर्माण झालं आहे.

इंग्लंडविरुद्ध टी – २० सिरीज जिंकल्यानंतर भारताचा आत्मविश्वास वाढला आहे. गुरुवारपासून भारत आणि इंग्लंडमध्ये वनडे मॅच सुरु होत आहेत. नॉटिंगहॅममधील ट्रेंटब्रिज मैदानावर ही मॅच खेळवळ्यात येणार आहे. इंग्लंडच्या मैदानात जाऊन त्यांना हरवण्याची भारतीय टीमची इच्छा आहे. मात्र भारतासाठी हे ध्येय सोपं नाही. नुकतंच इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला वनडे सिरीजमध्ये मात दिली आहे. त्यामुळं दोन्ही टीममधील चुरस बघण्यासारखी असणार आहे.

विराटसमोर टीमचं आव्हान

भारत कितीही फॉर्ममध्ये असला तरीही विराटसमोर मात्र जिंकण्यासाठी आव्हान निर्माण झालं आहे. भारताचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारच्या फिटनेसच्या चिंतेमुळं त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. तर बुमराहेदेखील खेळत नाही. त्याच्या जागी शार्दुल ठाकूर अथवा सिद्धार्थ कौलला संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान इंग्लंडकडून क्रिस वोक्स खेळणार नसल्याची माहिती आहे.

- Advertisement -

चुरशीची मॅच होण्याची शक्यता

गुरुवारी होणारी मॅच चुरशीची होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयसीसी रँकिंगमधील जगातील टॉप २० खेळाडूंमधील ८ खेळाडू या मॅचमध्ये खेळणार आहेत. त्यामुळं ही मॅच हायव्हॉल्टेज होणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. इंग्लंड सध्या १ क्रमांकाची टीम असून भारताला चांगलीच टक्कर देणार आहे.

संभाव्य भारतीय टीम

विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, के. एल. राहुल, एम. एस. धोनी, हार्दिक पांड्या, सुरेश रैना, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार/शार्दुल ठाकूर

- Advertisement -

संभाव्य इंग्लंड टीम

जेसन रॉय, जॉनी बेयरस्टॉ, जो रूट, इयान मॉर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, डेव्हिड विली, लियाम प्लँकेट, आदील रशीद, मार्क वूड.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -