Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Ind vs Aus: स्मिथची शतकी खेळी; पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया तीनशेपार

Ind vs Aus: स्मिथची शतकी खेळी; पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया तीनशेपार

Related Story

- Advertisement -

सीडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या तीसऱ्या कसोटीत स्मिथच्या १३० आणि लाबुशनची ९१ धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३८ धावांवर आटोपला. पदार्पण करणाऱ्या पुलोव्हस्कीने संयमी ६२ धावांची खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या दिवशी चांगल्या स्थितीत होता. मात्र, रविंद्र जाडेजा-बुमराह यांच्या भेदक माऱ्यापुढे दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढासळली. स्मिथच्या १३० धावांच्या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात सर्व गड्यांच्या मोबदल्यात ३३८ धावा केल्या आहेत. भारताकडून बुमराह आणि सैनी यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले.

- Advertisement -