Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs AUS : दुखापतींना मागे सारत मालिका विजयासाठी टीम इंडिया तयार!

IND vs AUS : दुखापतींना मागे सारत मालिका विजयासाठी टीम इंडिया तयार!

ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावस्कर करंडक पुन्हा मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

Related Story

- Advertisement -

सिडनी कसोटी अनपेक्षितरित्या अनिर्णित राखल्यानंतर भारताचे शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या ब्रिस्बन कसोटीत विजय मिळवत मालिका जिंकण्याचे लक्ष्य आहे. परंतु, सिडनी कसोटी अनिर्णित राखताना भारताच्या बऱ्याच खेळाडूंना दुखापती झाल्या. त्यामुळे या सामन्यात खेळण्यासाठी अकरा खेळाडू असणार का? असा प्रश्न भारतापुढे होता. तसेच क्वारंटाईनच्या कडक नियमांमुळे भारतीय संघ ब्रिस्बनमध्ये हा सामना खेळण्यास फारसा उत्सुक नव्हता. मात्र, आता या सर्व आव्हानांना मागे टाकण्यास अजिंक्य रहाणेचा भारतीय संघ विजय मिळवण्यास तयार आहे.

बॉर्डर-गावस्कर करंडक सध्या भारताकडे आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावस्कर करंडक पुन्हा मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. सिडनी कसोटी भारताने अनिर्णित राखली होती. परंतु, या सामन्यादरम्यान रविंद्र जाडेजा, रिषभ पंत, हनुमा विहारी आणि अश्विन या भारताच्या खेळाडूंना दुखापत झाली. त्यामुळे जाडेजा आणि विहारीला ब्रिस्बन कसोटीतून माघार घ्यावी लागली. भारतासाठी समाधानकारक बाब म्हणजे पंत आणि अश्विनची दुखापत फारशी गंभीर असून ते या कसोटीत खेळू शकणार आहेत.

- Advertisement -

ब्रिस्बनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. मात्र, सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या कसोटीत खेळण्याबाबत साशंकता आहे. तो या सामन्यात खेळू न शकल्यास भारताच्या गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज, मोहम्मद सैनी, शार्दूल ठाकूर आणि नटराजन सांभाळतील. त्यांना ऑफस्पिनर अश्विनची साथ लाभेल. तसेच विहारीच्या जागी मयांक अगरवाल आणि वृद्धिमान साहा यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.


प्रतिस्पर्धी संघ –

- Advertisement -

ऑस्ट्रेलिया : टीम पेन (यष्टीरक्षक/कर्णधार), डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लबूशेन, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरुन ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नेथन लायन, जॉश हेझलवूड.

भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), मयांक अगरवाल/वृद्धिमान साहा,अश्विन, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, नटराजन/जसप्रीत बुमराह.

सामन्याची वेळ : सकाळी ५.३० पासून, थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisement -