घरक्रीडाInd vs Aus : ७० वर्षातला भारताचा 'ऐतिहासिक' विजय

Ind vs Aus : ७० वर्षातला भारताचा ‘ऐतिहासिक’ विजय

Subscribe

भारतीय संघाने गेल्या ७० वर्षांत ऑस्ट्रेलियामध्ये खेळली गेलेली पहिली टेस्ट सिरीज जिंकण्याचा विक्रम रचला आहे.

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. सिडनीमध्ये झालेल्या टेस्ट सिरीजमधील चौथी आणि शेवटची टेस्ट मॅच पावसामुळे ड्रॉ घोषित केली गेली. त्यामुळे भारतीय संघाने सिरीजमध्ये २-१ च्या फरकाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. भारताचा गेल्या ७० वर्षांमधील हा ऐतिहासिक विजय आहे. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये झालेली पहिली टेस्ट सिरीज जिंकली आहे. मागील ७० वर्षांत एकदाही भारतीय संघाला ऑस्ट्रेलियातील मालिकेत विजय मिळाला नव्हता. काल इतक्या वर्षांनी प्रथमच कर्णधार विराट कोहलीच्या संघाने ऑस्ट्रेलियन सिरीजमध्ये विजयाचा झेंडा रोवला. चौथ्या कसोटीमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना भारताने मजबूत आघाडी घेतली होती. पुजारा १९३, ऋिषभ पंत १५९ आणि जाडेजा ८१ या तिघांच्या खेळीवर भारताने ६२२ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर उभे केले होते. याचा पाठलाग करत असताना ऑस्ट्रेलियाचा पुर्ण संघ ३०० धावांवर बाद झाला. कुलदीप यादव याने सर्वाधिक ५ बळी घेऊन त्याच्याही नावावर ऑस्ट्रेलियात त्यांच्याविरोधात पाच बळी घेण्याचा नवा विक्रम स्वतःच्या नावावर केला.

 

- Advertisement -


चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ८ बाद करत २५८ धावांपर्यंत मदल मारली होती. मात्र त्यानंतर भरताकडून जाडेजा, बुमराहने सर्वाधिक ३-३ बळी टिपले आणि सामन्यात ९ बळी टिपणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीर घोषित करण्यात आले. भारतीय गोलंदाजांनी या कसोटी अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले. भारताने दुसरा डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी आला. पहिल्या डावात ८ धावांनी बाद झालेला सलामीवीर फिंच दुसऱ्या डावात केवळ ३ धावाच करु शकला. बुमराहने पहिल्या डावातील धडाका दुसऱ्या डावातही कायम ठेवला आणि फिंचच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियासमोर ६२२ धावांचे आवाहन ठेवले होते. मात्र, कांगारुंनी ३०० धावातच खेळ आटपल्यामुळे ३० वर्षांनंतर त्यांचा त्यांच्याच होम ग्राउंडवर दणदणीत पराभव झाला.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -