घरक्रीडादीपकचा आनंद गगनात मावेना कारण 'या' व्यक्तीने केले त्याचे कौतूक!

दीपकचा आनंद गगनात मावेना कारण ‘या’ व्यक्तीने केले त्याचे कौतूक!

Subscribe

कालचा भारत विरूद्ध बांग्लादेश हा टी २० सामन्यातील शेवटचा सामना रंगला. भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली. या सामान्यात एका भारतीय खेळाडूने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले तो खेळाडू म्हणजे दीपक चहर. दीपक चहरने बांग्लादेशला केवळ ७ धावा देऊन ६ बळी घेतले. दीपकच्या या कृतीचे सगळ्या स्तरातून कौतूक होत आहे. पण सध्या दीपकचा आनंद गगनात मावत नाहीये. कारण दीपकचे कौतूक क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडूलकरने केले आहे. सचिनने ट्वीट करत दीपकचे कौतूक केले आहे.

- Advertisement -

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने दीपक चहरची स्तुती केली. ‘दीपकची गोलंदाजी अप्रतिम होती. त्याने खूप चतुराईने आणि विविधतेने गोलंदाजी करत मोक्याच्या क्षणी बांगलादेशचे गडी बाद केले. शिवम दुबे, श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनीही निर्णायक सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली’, असे ट्विट सचिनने केले आहे.

- Advertisement -

मुंबईकर श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे, तसेच दीपक चहरच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर भारताने तिसर्‍या टी-२० सामन्यात बांगलादेशला ३० धावांनी पराभूत केले. या सामन्यात श्रेयसने ३३ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. आपला अकरावा टी-२० सामना खेळणार्‍या श्रेयसचे हे पहिले टी-२० अर्धशतक होते. गोलंदाजीत चहरने हॅटट्रिकसह ६, तर दुबेने ३ गडी बाद केले.

श्रेयसने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत ऑफस्पिनर अफीफ हुसेनच्या एकाच षटकात सलग तीन षटकार लगावले आणि २७ चेंडूत आपले टी-२० क्रिकेटमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. रिषभ पंतला मात्र पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्याला अवघ्या ६ धावांवर सरकारने बाद केले. याच षटकात त्याने श्रेयसला ६२ धावांवर माघारी पाठवले. कृणाल पांड्याच्या जागी या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या मनीष पांडेने १३ चेंडूत नाबाद २२, तर दुबेने नाबाद ९ धावा केल्या. त्यामुळे भारताने २० षटकांत ५ बाद १७४ अशी धावसंख्या उभारली.

याचा पाठलाग करताना बांगलादेशची तिसर्‍याच षटकात २ बाद १२ अशी अवस्था होती. वेगवान गोलंदाज दीपक चहरने लिटन दास (९) आणि सौम्या सरकार (०) यांना माघारी पाठवले. परंतु, नवखा मोहम्मद नईम आणि मोहम्मद मिथुन यांनी तिसर्‍या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी करत बांगलादेशच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. डावखुर्‍या नईमने उत्कृष्ट फलंदाजी करत ३४ चेंडूत अर्धशतक झळकावले. मात्र, चहरने पुन्हा आपली जादू चालवत मिथुनला २७ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. तो बाद झाल्यावरही नईमने आपली फटकेबाजी सुरु ठेवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -