घरक्रीडाभारताचा इंग्लंडकडून दारूण पराभव, मालिकाही भारताने गमावली

भारताचा इंग्लंडकडून दारूण पराभव, मालिकाही भारताने गमावली

Subscribe

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा भारतावर ८ विकेट्सने विजय, तीन एकदिवसीय सामन्याची मालिकाही इंग्लंडने २-१ च्या फरकाने आपल्या नावे केली

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारतावर ८ विकेट्सने विजय मिळवत सामना जिंकला आहे. सामन्यासोबतच इंग्लंडने २-१ च्या फरकाने ही एकदिवसीय सामन्यांची मालिकादेखील जिंकली आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला त्यामुळे आज होणारा सामना निर्णायक होता. त्यामुळे आजची तिसरी आणि निर्णायक मॅच जिंकल्यामुळे इंग्लंडने मालिका आपल्या नावे केली आहे.

असा झाला सामना

सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत बॉलिंग निवडली आणि भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन बॅटिंग साठी आले. सामन्याच्या सुरूवातीपासूनच भारत धिम्यागतीने खेळताना दिसत होता. अवघ्या १३ रनांवर भारताचा पहिला विकेट गेला. रोहित शर्मा केवळ २ रन करून आउट झाला. ज्यानंतर विराट आणि शिखरने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला खरा मात्र १८ व्या ओव्हरला शिखर ४४ रन करून आउट झाला.ज्यानंतर एकएक करत भारताचे विकेट पडले. शेवटी-शेवटी धोनीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र ४६ व्या ओव्हरला धोनी ४२ रन करून आउट झाला. डावाच्या अखेरीस शार्दूलने प्रयत्न करत संघाला २५० धावा पूर्ण करून दिल्या आणि भारताकडून इंग्लंडला २५७ धावांचे आव्हान देण्यात आले. भारताकडून सर्वाधिक रन भारतीय कर्णधार विराट कोहली याने केले होते त्याने ७२ बॉलमध्ये ७१ रन केले होते.

- Advertisement -

त्यानंतर इंग्लंडने बॅटिग करताना भारतावर तब्बल ८ गडी राखत विजय मिळवला. इंग्लंडचा कॅप्टन इयॉन मॉर्गन आणि जो रुट यांनी केलेल्या पार्टनरशीपच्या मदतीने इंग्लंडने भारतावर विजय मिळवला आहे. इंग्लंडच्या पहिल्या दोन विकेट लवकर गेल्या मात्र त्यानंतर जो रूट आणि मॉर्गन यांनी अप्रतिम खेळ दाखवत सामना आपल्या नावे केल्या. जो रूटने नाबाद १०० तर मॉर्गनने नाबाद ८८ रन केले. भारताकडून शार्दूलने केवळ एक विकेट घेतला.

इंग्लंडने भारतावर मिळवलेल्या या धमाकेदार विजयामुळे तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने २-१ च्या फरकाने विजय मिळवत मालिकेत विजय मिळवला आहे.

- Advertisement -

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -