India Vs Sonth Africa, 2nd Test : नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

Mumbai
India Vs Sonth Africa, 2nd Test : India win toss and chose bat first
India Vs Sonth Africa, 2nd Test : नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून सुरु होत आहे. या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने याअगोरदचा सामना जिंकून कसोटी सामन्यांच्या मालिकेचत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजपासून सुरु होणारा सामना हा पुण्यातील महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर होणार आहे.

कसोटी सामन्यावर पावसाचे सावट

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात दुपारनंतर मुसळधार पाऊस पडत आहे. आजपासून सुरु झालेला सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने दिललेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुण्याच्या गहुंजे येथे होणाऱ्या या सामन्यावरही पावसाचे सावट आहे.

दोन्ही संघांची टीम

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, रिषभ पंत, कुलदीप यादव, शुभमन गिल, उमेश यादव.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), टेंबा बवूमा, थानीस डी ब्रून, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डीन एल्गर, झुबैर हमजा, केशव महाराज, एडन मार्करम, सेनूरन मुथुसामी, लुंगी इंगिडी, एन्रिच नॉर्टजे, व्हर्नोन फिलँडर, डेन पीड, कागिसो रबाडा, हेन्रिक क्लासन.