घरक्रीडावेस्ट इंडिजविरुद्धच्या सराव सामन्यासाठी करूण नायरकडे नेतृत्व 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सराव सामन्यासाठी करूण नायरकडे नेतृत्व 

Subscribe

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सराव सामन्यासाठी अध्यक्षीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व करूण नायरकडे सोपवण्यात आले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी होणाऱ्या सराव सामन्यासाठी अध्यक्षीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात १३ खेळाडू आहे. या संघाचे नेतृत्व करूण नायरकडे सोपवण्यात आले आहे. तर या संघात इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीचाही समावेश आहे. तसेच मुंबईकर पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर यांनाही या संघात स्थान मिळाले आहे. तसेच या संघात सौरभ कुमार या नवीन खेळाडूलाही संधी मिळाली आहे. ४ ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार असून या दौऱ्यात २ कसोटी सामने होतील.

अध्यक्षीय संघ :- करूण नायर (कर्णधार), हनुमा विहारी, मयांक अगरवाल,श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, अंकित बावने, इशान किशन (यष्टीरक्षक), जलल सक्सेना, सौरभ कुमार, बसिल थम्पी, आवेश खान, के. विघ्नेश, इशान पोरेल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -