घरक्रीडाऑस्ट्रेलियात भारताला हार्दिकची उणीव भासेल - मायकल हसी

ऑस्ट्रेलियात भारताला हार्दिकची उणीव भासेल – मायकल हसी

Subscribe

दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौरा मुकणाऱ्या हार्दिक पांड्याची भारताला उणीव भासेल असे मायकल हसीचे मत आहे. 

भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याला आशिया चषकात पाठीला दुखापत झाली होती. या दुखापतीतून अजून सावरला नसल्याने हार्दिकला भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारताला हार्दिकची उणीव भासेल असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल हसीने व्यक्त केले आहे.

हार्दिकमुळे भारतीय संघ अधिक समतोल

हार्दिकबद्दल हसी म्हणाला, “हार्दिक हा एक अप्रतिम खेळाडू आहे. त्याचा खेळ ऑस्ट्रेलियन परिस्थितीसाठी अगदी साजेसा आहे. तसेच तो एक वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू आहे. त्याच्या असण्याने भारतीय संघ अधिक समतोल असतो. त्यामुळे त्याची कमी भारताला नक्कीच उणीव भासेल.”

ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज भारतापेक्षा सरस 

स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत भारताला या दौऱ्यात कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. पण हसीच्या मते ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी भारतीय गोलंदाजीपेक्षा सरस असल्याने भारताला ही मालिका जिंकणे अवघड जाईल. याविषयी हसी म्हणाला, “भारताला ही मालिका जिंकण्याची संधी आहे. त्यांचे गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. पण ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी त्यापेक्षाही चांगली आहे. त्यामुळे भारताच्या फलंदाजांना त्यांच्यासमोर धावा करण्यासाठी झुंजावे लागेल. ऑस्ट्रेलिया संघ घरात नेहमीच चांगले प्रदर्शन करतो. त्यामुळे त्यांना हरवणे भारताला खूप अवघड जाईल.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -