घरक्रीडाभारतासाठी अजून काही सामने खेळायला आवडले असते !

भारतासाठी अजून काही सामने खेळायला आवडले असते !

Subscribe

मी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इतक्या धावा केल्या याचा आनंद आहे, पण यापैकी काही धावा भारतासाठी झाल्या असत्या तर जास्त आनंद झाला असता, असे भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा वसीम जाफर म्हणाला. वसीमने वर्षानुवर्षे आधी मुंबई आणि त्यानंतर विदर्भाकडून चांगली कामगिरी केली आहे.

तो रणजी करंडक, दुलीप करंडक, इराणी करंडक या मानाच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलदांज आहे. तर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी ३१ सामन्यांच्या ५८ डावांत १९४४ धावा केल्या आहेत. यात दोन द्विशतकांचाही समावेश आहे. त्याने भारतासाठी अखेरचा सामना २००८ मध्ये खेळला होता. त्यामुळे त्याला भारतासाठी अजून काही सामने खेळता आले नाहीत याची खंत आहे.

- Advertisement -

मी इतकी वर्षे क्रिकेट खेळू शकलो हे माझे भाग्य आहे. जेव्हा तुम्ही इतकी वर्षे खेळता तेव्हा तुम्ही काही विक्रम आपल्या नावे करणारच. हे विक्रम केल्याचा मला आनंद आहेच, पण भारतासाठी अजून काही सामने खेळता आले नाहीत याची खंत आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या धावांपैकी काही धावा या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झाल्या असत्या तर त्याचा मला जास्त आनंद झाला असता, असे जाफर म्हणाला. तसेच पुढील वर्षी सलग तिसर्‍यांदा विदर्भाला रणजी करंडक जिंकवून देण्याचे आपले लक्ष्य आहे असेही त्याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -