घरक्रीडाभारतीय फलंदाजांना आणखी सरावाची गरज - राहुल द्रविड

भारतीय फलंदाजांना आणखी सरावाची गरज – राहुल द्रविड

Subscribe

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मते भारतीय फलंदाजांना जर इंग्लंडसारख्या कठीण परिस्थितीत चांगले प्रदर्शन करायचे असेल तर त्यांना आणखी सराव करणे गरजेचे आहे.

इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा ४-१ असा पराभव झाला. या मालिकेत भारतीय फलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले नाही. भारताचा माजी कर्णधार आणि भारत ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मते भारतीय फलंदाजांना जर इंग्लंडसारख्या कठीण परिस्थितीत चांगले प्रदर्शन करायचे असेल तर त्यांना आणखी सराव करणे गरजेचे आहे.

कोहली सोडून इतर फलंदाजांची प्रदर्शन निराशाजनक

द्रविड भारतीय फलंदाजांच्या इंग्लंडमधील प्रदर्शनाबाबत म्हणाला, “इंग्लंडच्या परिस्थितीत फलंदाजी करणे खूप अवघड आहे. या मालिकेत दोन्ही संघांच्या फलंदाजांना चांगले प्रदर्शन करता आले नाही. या मालिकेत विराट कोहली वगळता एकाही फलंदाजाने सातत्यपूर्ण प्रदर्शन केले नाही. मी इंग्लंडमध्ये बरेच क्रिकेट खेळलो आहे. पण या मालिकेतील परिस्थिती ही फलंदाजांना फारच प्रतिकूल होती. पण कारणे देऊन चालणार नाही. भारतीय फलंदाजांना इंग्लंडमध्ये चांगले प्रदर्शन करायचे असेल तर त्यांना अधिक सराव करण्याची गरज आहे. पुढच्या वेळी इंग्लंड दौऱ्याला जाण्यापूर्वी भारतीय संघाने या गोष्टी लक्षात ठेऊन सराव करणे आवश्यक आहे.”

आशिया चषक जिंकणे कठीण

सध्या सुरू असलेल्या आशिया चषकाविषयी द्रविड म्हणाला, “भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. पण भारताने गाफील राहून चालणार नाही. फक्त पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याला प्राधान्य देणे भारतासाठी धोकादायक ठरू शकेल. बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघही सध्या खूप चांगले प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे भारताला ही स्पर्धा जिंकणे सोपे नसेल.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -