घरक्रीडाभारताचा 'हा' खेळाडू झाला जखमी, भारतीय गोटात चिंता

भारताचा ‘हा’ खेळाडू झाला जखमी, भारतीय गोटात चिंता

Subscribe

दुसऱ्या सामन्यात शुभमन गिलला संधी मिळू शकते.

भारतीय संघ २८ फेब्रुवारीला न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर भारत १-०ने पिछाडीवर आहे. त्यामुळे व्हाईटवॉश पासून वाचण्यासाठी भारताला विजयाची गरज आहे. मात्र या सामन्याआधी विराटसह भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा एक खेळाडू सरावादरम्यान जखमी झाला आहे.

वेलिंग्टनमधील पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांनी सुमार दर्जाची कामगिरी केली होती. त्यामुळे भारताचा सामन्यात १० विकेट्सने दारुन पराभव झाला होता. सलामीवीर पृथ्वी शॉला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. दरम्यान, पृथ्वी शॉला सराव करताना दुखापत झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात शॉ खेळणार की नाही याबाबत साशंकता आहेत. त्यामुळे भारताच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

- Advertisement -

पृथ्वी शॉच्या पायाला आली सूज

सरावादरम्यान पृथ्वी शॉच्या पायाला सूज आली आहे. आज डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. पृथ्वी पायाच्या दुखापतीमुळे बुधवारी सराव करू शकला नाही. जर शॉचे रिपोर्ट गंभीर आले तर त्याला दुसरा सामन्या मुकावे लागेल. त्यामुळे त्याची जागी गिलला संधी मिळू शकते. गिलने आतापर्यंत भारताकडून एकही सामना खेळलेले नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -