घरक्रीडागांगुलीच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रिकेट बहरेल!

गांगुलीच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रिकेट बहरेल!

Subscribe

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. बीसीसीआयची निवडणूक लढण्यास इच्छुक असणार्‍यांना अर्ज भरण्यासाठी सोमवार हा शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी गांगुली हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरणारा एकमेव उमेदवार होता. त्यामुळे त्याची निवड केवळ औपचारिकता उरली आहे. गांगुलीची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्याचा भारतीय संघातील माजी सहकारी व्ही.व्ही.एस लक्ष्मणने अभिनंदन केले.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल सौरव गांगुलीचे अभिनंदन. त्याच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रिकेट बहरेल आणि प्रगती करेल याची मला खात्री आहे. दादा तुला नव्या भूमिकेत खूप यश मिळो यासाठी शुभेच्छा, असे लक्ष्मणने आपल्या ट्विटमध्ये लिहिले. गांगुलीने त्याचे आभार मानताना ट्विटरवर लिहिले, शुभेच्छांबद्दल व्ही.व्ही.एस तुझे खूप आभार. तुझे योगदान खूप महत्त्वाचे असणार आहे.

- Advertisement -

तसेच भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही गांगुलीला शुभेच्छा दिल्या. दादा (सौरव गांगुली) तुझे अभिनंदन. देर है, अंधेर नही. भारतीय क्रिकेटसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. तू याआधीच भारतीय क्रिकेटला खूप योगदान दिले आहेस आणि यापुढेही देत राहशील अशी आशा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -