घरक्रीडाIND vs AUS : रोहित शर्मा, शुभमन गिलचा सिडनी कसोटीत खेळण्याचा मार्ग मोकळा 

IND vs AUS : रोहित शर्मा, शुभमन गिलचा सिडनी कसोटीत खेळण्याचा मार्ग मोकळा 

Subscribe

रोहित पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकला होता.

रोहित शर्मा, शुभमन गिल, रिषभ पंत, नवदीप सैनी आणि पृथ्वी शॉ या भारताच्या पाच क्रिकेटपटूंना शनिवारी क्वारंटाईन करण्यात आले होते. या पाच जणांनी जैव-सुरक्षित वातावरणाच्या (बायो-बबल) नियमांचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमांनुसार, खेळाडूंना बाहेर पडण्याची परवानगी आहे. मात्र, बाहेरील हॉटेलमध्ये जाऊन जेवण्यास त्यांना सक्त मनाई आहे. असे असतानाही भारताचे पाच क्रिकेटपटू मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये जाऊन जेवले होते. त्यामुळे ते सिडनी कसोटीला मुकण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, आता त्यांचा सिडनी कसोटीत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे सोमवारी बीसीसीआयने सांगितले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याला ७ जानेवारीपासून सुरुवात होणार असून भारताच्या खेळाडूंची रविवारी कोरोना चाचणी झाली. ‘भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांची ३ जानेवारीला कोरोनासाठीची आरटी-पीसीआर चाचणी झाली. सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे,’ अशी माहिती बीसीसीआयने दिली.

- Advertisement -

रोहित, गिल, पंत, सैनी आणि शॉ यांचाही कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार आहेत. या सामन्यासाठी शॉ आणि सैनी यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. परंतु, सिडनीत होणाऱ्या या कसोटीत रोहित, गिल आणि पंत खेळणार हे जवळपास निश्चित आहे. रोहित पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकला होता. मात्र, तिसऱ्या कसोटीत त्याचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -