घरक्रीडासरदार सिंगची निवृत्ती 

सरदार सिंगची निवृत्ती 

Subscribe

भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंगने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंगने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो भारतासाठी १२ वर्षे खेळाला. या १२ वर्षांत त्याने ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. तर २००८ ते २०१६ या काळात तो भारताचा कर्णधार होता. एशियन गेमच्या वेळी त्याने २०२० ऑलिम्पिकमध्ये खेळणार असल्याचे म्हटले होते. मात्र, आता त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

युवा खेळाडूंना संधी मिळण्यासाठी निवृत्त 

निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा करताना सरदार म्हणाला, “मी खूप हॉकी खेळलो. १२ वर्षं हा खूप मोठा काळ असतो. आता नवीन खेळाडूंना संधी मिळण्याची गरज आहे. त्यामुळे मी निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. या निर्णयाविषयी मी माझे कुटुंब, हॉकी इंडिया यांच्याशी बोललो आणि निवृत्तीचा निर्णय घेतला.”

२०१५ मध्ये पद्म्रीने सन्मान 

सरदाराने २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्व आपले पदार्पण केले. पदार्पणापासूनच तो भारतीय संघाचा महत्वाचा भाग झाला. २००८ साली त्याला भारतीय संघाचे कर्णधारपद दिले गेले. तो २ ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा भाग होता. त्याला २०१२ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि २०१५ मध्ये पद्म्री पुरस्काराने सन्मानित केले गेले.

तुला अजून खेळताना बघायला आवडले असते – विजेंदर 

भारताचा बॉक्सर विजेंदर सिंग याने ट्विट करून सरदार सिंगला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विजेंदरने सरदारला आणखी काही काळ खेळताना बघायला आवडले असते असेही लिहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -