घरक्रीडाभारतीय नेमबाज सौरभ चौधरीने जिंकले सुवर्ण पदक

भारतीय नेमबाज सौरभ चौधरीने जिंकले सुवर्ण पदक

Subscribe

महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत, मनू भाकरने १९ शॉटसह पाचवे तर देवंशी राणाने आठवे स्थान मिळवले आहे

जर्मनीत इंटरनॅशनत शूटिंग स्पोर्ट फेडरेशनचा (आयएसएसएफ) ज्युनिअर विश्वचषक सुरू आहे. या विश्वचषकात भारताची आतापर्यंतची कामगिरी उत्तम सुरू आहे. यात सौरभ चौधरीने सुवर्ण पदक जिंकत आणखी चार-चाँद लावले आहेत. १६ वर्षीय भारतीय नेमबाज सौरभ चौधरीने मंगळवारी अप्रतिम प्रदर्शन दाखवत सुवर्णपदक जिंकले आहे.

सौरभने १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत २४ शॉट्ससह एकूण २४३.७ गुण नोंदविले आहेत. स्पर्धेत सौरभ पोठोपाठ कोरियन नेमबाज लिम होजिनने दुसरे तर चीनचा वांग झहाहोने तिसरे स्थान पटकावले आहे. कोरियाच्या लिमने २३९.६ गुणांसह रौप्य पदक मिळवले आहे आणि चीनच्या वांग झहाहोने २१८.७ गुणांसह कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे. सौरभसोबतच भारताकडून अनमोल जैन हा देखील अंतिम फेरीत पोहोचला होता. त्याने १९९.६ गुणांसह चौथे स्थान पटकावले आहे.

- Advertisement -

भारताकडून उत्कृष्ट कामगिरी

सौरभ चौधरीने मिळवलेल्या सुवर्णपदकासोबतच महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत, मनू भाकरने १९ शॉटसह पाचवे तर देवंशी राणाने आठवे स्थान मिळवले आहे. सौरभ, अनमोल आणि अभिषेक आर्य या त्रिकूटाने १० मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत १७३० गुणांसह पहिले स्थान पटकावले आहे. तर अर्जुन सिंह चीमा, गौरव राणा आणि उध्यवीर सिंधू या तिघांनी १६४३ गुणांसह तिसरे स्थान मिळवले आहे.

सौरभने केला वर्ल्ड रेकॉर्ड

भारताच्या सौरभ चौधरीने २४३.७ गुण नोंदवत १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे. त्याने हा रेकॉर्ड आयएसएसएफ ज्युनिअर विश्वचषकात केलो असून या आधीचा २४२.५ गुणांचा रेकॉर्ड चीनच्या वांग झहाहो याच्या नावे होता. त्याने हा रेकॉर्ड सिडनीत झालेल्या पहिल्या आयएसएसएफ ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेत नोंदविला होता.

saurabh
सौरभने केला वर्ल्ड रेकॉर्ड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -