घरक्रीडाविंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

Subscribe

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांचे आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. एम.एस.के प्रसाद अध्यक्षीय निवड समितीने गुरुवारी कोलकाता येथे भारतीय संघाची निवड केली. विंडीजचा संघ या भारत दौऱ्यात ३ टी-२० (६, ८, ११ डिसेंबर) आणि ३ एकदिवसीय (१५, १८, २२ डिसेंबर) सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माला टी-२० मालिकेसाठी विश्रांती मिळेल असा अंदाज वर्तवला जात होता, पण तसे झालेले नाही. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या मुंबईकर शिवम दुबेचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

शमीने मागील काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरी केली आहे. बांगलादेशविरुद्ध सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने ७ विकेट्स मिळवल्या होत्या. त्यामुळे त्याचे टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. त्याने आपला अखेरचा टी-२० सामना जुलै २०१७ मध्ये खेळला होता. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवचाही टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने मात्र आपले संघातील स्थान गमावले आहे.

भारतीय संघ –

- Advertisement -

एकदिवसीय
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार

टी-२०
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -