इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स टेनिस

नदालची दुखापतीमुळे माघार, फेडरर फायनलमध्ये

Mumbai
राफेल नदाल

दोन महान टेनिसपटू रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यातील इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, या दोघांमधील ३९ वा सामना होऊ शकला नाही. नदालने गुढघ्याच्या दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घेतली आणि फेडररने अंतिम फेरीत प्रवेश केला. चौथ्या सीडेड फेडररला विक्रमी सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी अंतिम फेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमचे आव्हान असणार आहे.

कारेन खाचानोवाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात नदालच्या उजव्या गुढघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो सावरू शकला नाही. फेडररविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यातून माघार घेतल्यानंतर नदाल म्हणाला, या सामन्यात मला चांगले खेळता यावे यासाठी मी सर्वोत्तम प्रयत्न करत होतो. मात्र, सकाळी वॉर्मअप करताना मला कळले की मी या सामन्यात, उपांत्य फेरीत चांगले खेळू शकणार नाही. त्यामुळे मी माघार घेतली.

दुसर्‍या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असणार्‍या डॉमिनिक थीमने कॅनडाच्या मिलॉस रॉनीचचा ७-६, ६-७, ६-४ असा पराभव केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here