घरक्रीडाअवघ्या २७ रन्समध्ये मलेशियाचा महिला संघ ऑलआऊट

अवघ्या २७ रन्समध्ये मलेशियाचा महिला संघ ऑलआऊट

Subscribe

क्लालालंपूर येथे महिला टी-२० आशिया कपचा सलामीचा सामना झाला. भारत विरुद्ध मलेशियामध्ये झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ३ बाद १६९ धावा केल्या. यानंतर अप्रतिम बॉलिंग करत अवघ्या २७ धावांत भारताने मलेशियन संघाला ऑलआऊट करत १४२ धावांनी विजय मिळवला.

मिताली राजच्या नाबाद ९७ धावा

भारताने प्रथम फलंदाजी करत १६९ धावांचा डोंगर रचला. ज्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने ६९ चेंडूत नाबाद ९७ धावा केल्या, ज्यामध्ये १३ चौकारांसह एका षटकाराचा समावेश आहे. केवळ ३ धावांनी मिताली शतकापासून दूर राहिली असली तरीदेखील तिची खेळी वाखाणण्याजोगी होती. मितालीने टी-२० कर्णधार हरमनप्रीतसोबत ५३ चेंडूंमध्ये ८६ धावांची भागीदारी केली.

- Advertisement -

भारतीय बॉलर्सचा भेदक मारा

भारताच्या १६९ धावांचा पाठलाग करत असताना मलेशियन संघाला भारतीय बॉलर्सच्या अप्रतिप माऱ्याला सामोरे जावे लागले. यात पूजा वस्त्रकारने अप्रतिम बॉलिंग केली असून तिने केवळ ६ धावा देत ३ बळी घेतले. यानंतर अनुजा पाटील आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्यांनी एकही धाव दिली नाही. शिखा पांडेने देखील एक बळी घेतला. मलेशियाच्या सहा बॅट्समनना तर खातेही उघडता आले नाही. बाकी पाच बॅट्समनना दुहेरी धावसंख्या देखील गाठता आली नाही. केवळ पाच षटकांमध्येच मलेशियाचा अर्धा संघ तंबूत परतला होता. मलेशियाच्या साशा आजमीने १० चेंडूंमध्ये सर्वाधिक ९ धावा केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -