घरक्रीडाटीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात अ‍ॅडलेड किंवा ब्रिस्बनमध्ये? 

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात अ‍ॅडलेड किंवा ब्रिस्बनमध्ये? 

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. 

विराट कोहलीचा भारतीय संघ यावर्षीच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून या दोन संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हे सध्याच्या घडीला दोन सर्वोत्तम संघ मानले जात असल्याने या मालिकेबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात पर्थऐवजी अ‍ॅडलेड किंवा ब्रिस्बनमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.

क्वारंटाईनचे नियम शिथिल करण्यास नकार

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यानंतर त्यांचे बरेचसे खेळाडू युएईत होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत खेळणार आहेत. तेथून ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांचे खेळाडू ऑस्ट्रेलियात पर्थ येथे दाखल होणार होते. तिथेच ते सरावही करणार होते. मात्र, युएईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने तेथून येणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया राज्य सरकार क्वारंटाईनचे नियम शिथिल करण्यास तयार नाही. त्यामुळे भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला अ‍ॅडलेड किंवा ब्रिस्बनमध्ये सुरुवात होऊ शकेल.

- Advertisement -

क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पर्याय शोधावा लागणार  

भारतीय खेळाडूंना जैव-सुरक्षित वातावरणात क्वारंटाईनमध्ये असतानाही सराव करता यावा यासाठी बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे परवानगी मागितली होती. मात्र, आता वेस्टर्न ऑस्ट्रेलिया राज्य सरकार आपले नियम बदलण्यास तयार नसल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला वेगळा पर्याय शोधावा लागू शकेल. त्याचप्रमाणे या दौऱ्याची टी-२० मालिकेने सुरुवात होऊ शकेल आणि त्यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका होईल. याचे नव्याने तयार करण्यात आलेले वेळापत्रक या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -