घरक्रीडाभारताची गोलंदाजी सर्वोत्तम!

भारताची गोलंदाजी सर्वोत्तम!

Subscribe

विश्वचषकात भारतीय संघ जगातील सर्वोत्तम गोलंदाजी फळीसह उतरेल, असे मत भारताचे खेळाडू आणि सध्याचे झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले. ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होणार्‍या विश्वचषकात प्रत्येक संघ इतर सर्व ९ संघांशी सामना खेळणार असल्याने सर्वोत्तम गोलंदाजी करणारे संघच या स्पर्धेत चांगली कामगिरी करतील, असे अनेक क्रिकेट समीक्षकांचे मत आहे. तसेच चांगले अष्टपैलू असल्याचाही भारताला खूप फायदा होईल, असे राजपूत यांना वाटते.

माझ्या मते भारताकडे जगातील सर्वोत्तम गोलंदाजी फळी आहे. फक्त गोलंदाजीच नाही, तर भारताचा संपूर्ण संघच संतुलित आहे. भारतीय संघात खूप चांगले अष्टपैलू आहेत आणि जर तुम्ही इतर संघाकडे पाहिलेत, तर तुम्हाला कळेल की भारत या स्पर्धेत मजबूत संघनिशी उतरणार आहे. भारत ज्यादिवशी आपली सर्वोत्तम कामगिरी करेल, त्यादिवशी त्यांना हरवणे कोणालाही अवघड जाईल.

- Advertisement -

हार्दिक (पांड्या) हा असा खेळाडू भारताकडे आहे, जो आपल्या दिवशी संघाला एकहाती सामना जिंकवून देऊ शकतो. तसेच रविंद्र जडेजाही अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यात सक्षम आहे. त्यामुळे भारताला विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी आहे आणि हा संघ किमान अव्वल चार संघात असेलच, असे राजपूत म्हणाले.

भारताचे अव्वल तीन फलंदाज उत्कृष्ट

- Advertisement -

लालचंद राजपूत हे २००७ टी-२० विश्वचषक जिंकणार्‍या संघाचे क्रिकेट व्यवस्थापक होते. त्या संघात आणि सध्याच्या भारतीय संघात काय साम्य आहे असे विचारले असता राजूपत यांनी सांगितले, सध्याच्या भारतीय संघात खूप चांगले अष्टपैलू आहेत. चांगले अष्टपैलू असल्याने संघात खूप फरक पडतो. तसेच भारताचे अव्वल तीन फलंदाज उत्कृष्ट आहेत. आधी आपल्याकडे सचिन, सेहवागसारखे सलामीवीर होते आणि आता शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली हे अप्रतिम अव्वल तीन फलंदाज आहेत. त्यानंतर हार्दिक आणि महेंद्रसिंग धोनीसारखे अखेरच्या षटकांत फटकेबाजी करू शकतील असे फलंदाज आहेत. सध्याचा भारतीय संघ खूपच संतुलित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -