भारतीय संघाच्या सुपरफॅन आजी चारुलता पटेल यांचे निधन

New Delhi
charulata patel died
टीम इंडियाच्या सुपरफॅन आजी चारूलता पटेल यांचे निधन

क्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये बांग्लादेश विरूद्ध भारत अशा दोन संघात क्रिकेट सामना रंगला होता. या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ८७ वर्षाच्या चारूलता पटेल यांचे आज दुःखद निधन झाले आहे. बर्मिंगहॅम येथे झालेला सामना बघायला या आज्जीबाई व्हिलचेअरवरून सामना पाहायला आल्या होत्या. सामना संपल्यावर या आज्जीबाईंची कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी स्पेशल भेट घेतली होती.

चारुलता पटेल यांच्या कुटुंबियांनी क्रिकेट दादी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही आजींच्या निधनाची बातमी दिली आहे. १३ जानेवारी रोजी ५.३० वाजता आजींचे निधन झाले आहे.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here