घरक्रीडाIND vs AUS : वरुण चक्रवर्ती भारताच्या टी-२० संघात; रोहित, ईशांतबाबत प्रश्नचिन्ह  

IND vs AUS : वरुण चक्रवर्ती भारताच्या टी-२० संघात; रोहित, ईशांतबाबत प्रश्नचिन्ह  

Subscribe

रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा यांचा अजून संघात समावेश करण्यात आलेला नाही.

विराट कोहलीचा भारतीय पुरुष क्रिकेट संघ यावर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी सोमवारी भारताचे कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० संघ जाहीर करण्यात आले. सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणारा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचा टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला मात्र पुन्हा एकदा संधी मिळालेली नाही. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

या मालिकांसाठी भारताच्या निवड समितीची सोमवारी व्हिडीओ-कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. त्यानंतर तिन्ही संघांची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा यांचा अजून संघात समावेश करण्यात आलेला नाही. दोघांनाही सध्या दुखापत झाली असून बीसीसीआयची मेडिकल टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. हे दोघे फिट झाल्यावर त्यांचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, अश्विन, मोहम्मद सिराज

एकदिवसीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, लोकेश राहुल (उपकर्णधार/यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अगरवाल, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

- Advertisement -

टी-२० संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार/यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती  

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -