घरक्रीडानाशिकच्या तनिषाची दमदार कामगिरी

नाशिकच्या तनिषाची दमदार कामगिरी

Subscribe

आंतरराज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा टेबल टेनिस स्पर्धा

धर्मशाळा येथे नुकत्याच पार पडलेल्या यूटीटी आंतरराज्य आणि राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिषा कोटेचाने दमदार कामगिरी केली. तिने सब-ज्युनियर मुलींच्या गटात कांस्यपदक, तर पुण्याच्या पृथा व्हर्टीकरच्या साथीने खेळताना दुहेरीत रौप्यपदक पटकावले.

सांघिक प्रकारात महाराष्ट्राकडून खेळताना तनिषा आणि सायली वाणी यांनी कांस्यपदकाची कमाई केली. त्याआधी ठाणे येथे झालेल्या राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत तनिषा कोटेचाने सब-ज्युनियर मुलींच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक मिळवले होते. तसेच भावनगर येथे झालेल्या राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत १३ ते १५ वर्षांखालील मुलींच्या गटात रौप्यपदक पटकावण्यात तिला यश आले होते.

- Advertisement -

तनिषा आणि सायली नाशिक जिमखाना येथे जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. त्यांना या स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, जिमखान्याचे सचिव राधेश्याम मुंदडा, संघटनेचे सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, राकेश पाटील, संजय वसंत, अजिंक्य शिंत्रे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -