महाराष्ट्राच्या संघात मुंबईकर विकास धारियाची निवड

Mumbai
राष्ट्रीय कॅरम स्पर्धा

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटना यांच्या यजमानपदाखाली अखिल भारतीय कॅरम महासंघ आयोजित ४७ वी वरिष्ठ राष्ट्रीय व आंतर-राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा कुडाळ, सिंधुदुर्ग येथे १९ ते २३ फेब्रुवारी २०१९ दरम्यान रंगणार आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने गेल्या वर्षभरात झालेल्या तब्बल ११ स्पर्धांच्या कामगिरीवरून या स्पर्धेसाठी आपला संघ निवडला आहे, तसेच ही राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्रात होत असल्याने यजमान म्हणून महाराष्ट्रातील अतिरिक्त खेळाडूंनाही आपल्या क्रमवारीनुसार या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्राचा संघ-
पुरुष : विकास धारिया, फईम काझी, अमोल सावर्डेकर (मुंबई), अभिजीत त्रीपनकर (पुणे), जलालुद्दीन मुल्ला (सातारा), अभिषेक चव्हाण (रत्नागिरी)

महिला : मीनल लेले खरे (ठाणे), प्रीती खेडेकर, स्नेहा मोरे (मुंबई), मैत्रेयी गोगटे, मानली लिंगायत (रत्नागिरी), पुष्कर्णी भट्टड ( पुणे )

पुरुष वयस्कर गट : शब्बीर खान (मुंबई उपनगर) आणि देवशी कोळी (मुंबई)

महिला वयस्कर गट : शोभा कामत (कोल्हापूर) आणि मालती केळकर (मुंबई)

अतिरिक्त पुरुष खेळाडू : गिरीश तांबे, संजय मांडे, राहुल सोळंकी (मुंबई), राजेश गोहिल (ठाणे), शाबाझ शेख (मुंबई उपनगर), गणेश तावरे, किरण धेंडे , सागर वाघमारे (ठाणे)

अतिरिक्त पुरुष वयस्कर खेळाडू : अस्लम चिकते (मुंबई उपनगर), नंदकुमार म्हात्रे (मुंबई उपनगर), दत्ताराम वसावे (रत्नागिरी), गणेश पाटणकर (मुंबई)

अतिरिक्त महिला खेळाडू : अपूर्वा नाचणकर (रत्नागिरी), श्रुती सोनावणे (पालघर), नंदिता महाजन (ठाणे), वैभवी शेवाळे, प्रियांका चव्हाण (मुंबई)

अतिरिक्त महिला वयस्कर खेळाडू : माधुरी तायशेटे, प्रीती तळेकर, आशा नागपाल (मुंबई उपनगर), रोझिना गॉडद (मुंबई)

पुरुष संघ व्यवथापक : यतिन ठाकूर (मुंबई) आणि महिला संघ व्यवथापक : वीणा चव्हाण (ठाणे)