IPL 13 : सलामीच्या लढतीत मुंबई – चेन्नई आमनेसामने

पहिलाच मुकाबला बेस्ट विरूध्द बेस्ट; असे रंगणार सामने

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा यंदा युएईत १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार असल्याची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. या स्पर्धेच्या तयारीसाठी आठही संघ युएईत दाखलही झाले. मात्र, त्यानंतरही आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नव्हते. अखेर रविवारी हे वेळापत्रक जाहीर झाले. १९ सप्टेंबरला होणाऱ्या या स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री ७.३० वाजता सुरुवात होईल.

IPL 2020 TimeTable

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

रोहित शर्मा यांचा मुंबई आणि महेंद्रसिंग धोनी यांचा चेन्नई हे आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असून मागील वर्षी याच संघांमध्ये अंतिम सामना झाला होता. यात मुंबईने बाजी मारत विक्रमी चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे चेन्नईचे आता या पराभवाची परतफेड करण्याचे लक्ष्य असेल.

हेही वाचा –

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्री उडवून देऊ; दुबईहून आला धमकीचा कॉल