IPL 2019 SRH vs DC : हैदराबादला विजयासाठी दिल्लीचे १५६ धावांचे लक्ष्य

Hyderabad
sunrises hyderabad vs delhi capitals
खलील अहमदच्या या हंगामातील पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध हैदराबाद यांच्यात आयपीएलचा ३० वा सामना सुरु आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादकडून खलील अहमद आज पहिलाच सामना खेळत होता. खलीलने आपल्या पहिल्याच सामन्यात टिच्चून बॉलिंग करत ३० रन्स देऊन ३ विकेट घेतल्या. खलीलसहीत हैदराबादच्या सर्वच बॉलर्सनी भेदक मारा केल्यामुळे दिल्लीचा संघ फक्त १५५ धावा करु शकला. त्यामुळे हैदराबादपुढे १५६ धावांचे लक्ष्य आहे.

हैदराबाद पॉईंट्स टेबलमध्ये ६ पॉईंटसह सहाव्या क्रमाकांवर आहे तर दिल्ली ८ पॉईंट्ससह चौथ्या क्रमाकांवर आहे. त्यामुळे हैदराबाद हा सामना जिंकण्याच्या तयारीने मैदानात उतरली. दुसरीकडे दिल्लीच्या सलामीवीरांना मात्र मोठी खेळी करता आली नाही. पृथ्वी शॉ हा केवळ ४ रन्स करुन तर शिखर धवन ७ रन्स करुन बाद झाला. दोघांनाही खलील अहमदने आऊट केले. त्यानंतर भुवनेश्वर कुमार, रशीद खान, अभिषेक शर्मा यांनी देखील चांगली बॉलिंग करत दिल्लीच्या बॅट्समनवर नियंत्रण ठेवले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here