घरक्रीडाDC vs KXIP : श्रेयसने शेवटचा चौकार मारून सामना खिशात घातला

DC vs KXIP : श्रेयसने शेवटचा चौकार मारून सामना खिशात घातला

Subscribe

पंजाबने दिल्लीला १६२ धावांचे आश्वासक आव्हान दिले होते. या आव्हानाला सामोरे जाताना दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने जबरदस्त फलंदाजी केली. श्रेयस शेवटच्या षटकापर्यंत खेळला आणि शेवटचा चौकार मारून त्याने दिल्लीला विजय मिळवून दिला.

दिल्लीने ५ गडी राखत पंजाबचा पराभव केला. या विजयामध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांची फलंदाजी महत्त्वाची ठरली. दोघांनी जबरदस्त अर्धशतक केले. श्रेयसने अंतिम षटकापर्यंत खेळत दिल्लीला विजय मिळवून दिला. दिल्ली आणि पंजाब यांच्यात आयपीएलच्या १२ व्या मोसमातील ३७ वा सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय योग्य ठरला. दिल्लीने ५ गडी राखून पंजाबचा पराभव केला. हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर अर्थात फिरोजशहा कोटला मैदानावर खेळला जात आहे.

पंजाबच्या आव्हानाला सामोरे जाताना दिल्लीने आक्रमक खेळी केली. परंतु, सलामीवीर पृथ्वी शाॅ स्वतात तंबूत परतला. त्याने ११ चेंडूत १३ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर मैदानावर आला. श्रेयस आणि सलामीवीर शिखर धवन यांनी दिल्लीचा डाव सावरला. धवनने दमदार अर्धशतक केले. परंतु, अर्धशतकीनंतर मोठा फटका मारण्याच्या नादात धवन झेलबाद झाला. त्याने ४१ चेंडूत ५६ धावा केल्या. त्यानंतर ऋषभ पंत स्वस्तात परतला. त्याने ७ चेंडूत ६ धावा केल्या. त्यानंतर कुलिन इंग्राम आणि अक्षर पटेल काही धावांच्या अंतरावर बाद झाले. दरम्यान कर्णधार श्रेयस अय्यरने शेवटपर्यंत दमदार खेळी करत ४९ चेंडूत ५८ धावा केल्या. शेवटचे तीन‌ चेंडू उरलेले असताना श्रेयस्ने चौकार मारून संघाला विजयी केले.

- Advertisement -

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली. सलामीवीर लोकेश राहुल ९ चेंडूत १२ धावा करुन बाद झाला. यामध्ये त्याने १ चौकार आणि १ षटकार लगावला होता. त्यानंतर काही मयांक अग्रवालही २ धावा करुन बाद झाला. त्यापाठोपाठ काही धावांच्या अंतरावर डेव्हिड मिलरही बाद झाला. त्याने ५ चेंडूत ७ धावा केल्या. त्यानंतर मैदानावर मानदिप सिंहने सलामीवर ख्रिस गेलला साथ देत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ख्रिस गेलने आपली आक्रमक खेळी सुरु ठेवली. त्याने ३७ चेंडूत ६९ धावा केल्या. परंतु, अखेर उंच फटका मारण्याचा नादात गेल बाद झाला. त्यानंतर सॅम करनही शुन्यावर बाद झाला. करन नंतर मानदिप सिंह देखील बाद झाले. त्याने २७ चेंडूत ३० धावा केल्या. कर्णधार रविचंद्रन अश्विनने १४ चेंडूत १६ धाव केल्या. त्यानंतर हारप्रीत ब्रार आणि हार्दूस यांनी शेवटच्या षटका पर्यंत सामना ओढत नेऊन १६३ पर्यंत पंजाबच्या धावा पोहोचवल्या. त्यामुळे दिल्लीपुढे १६४ धावांचे आव्हान उभे राहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -