IPL 2019: पाहा आयपीएलचे संपुर्ण वेळापत्रक

Mumbai
IPL Schedule 2019
आयपीएल

इंडियन प्रीमिअर लीगची मालिका म्हणजे एकप्रकारची क्रिकेटची जत्रा. देशविदेशातील खेळांडूसोबत भारताच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू आयपीएलमध्ये आपल्याला खेळताना दिसतात. यावर्षी लोकसभा निवडणूक असल्यामुळे यावेळी आयपीएलचे सामने भारतात होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र बीसीसीआयने मंगळवारी साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक सध्या जाहीर करण्यात आले आहे.

२००९ साली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आले होते. यावेळी ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान भारतात सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. आयपीएलचा पहिला सामना डिफेंडीग चॅम्पियन सीएसके विरुद्ध आरसीबी असा असणार आहे. २३ मार्च रोजी चेन्नई येथे धोनी विरुद्ध कोहली असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. सध्या तरी २३ मार्च ते ५ एप्रिल पर्यंतचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुढील वेळापत्रक थोड्या दिवसांत जाहीर केले जाईल.

जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

 

IPL Schedule 2019 Page 1
पान १
IPL Schedule 2019 Page 2
पान २
IPL Schedule 2019 Page 3
पान ३

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here