हैद्राबादला मोठा झटका; ‘हा’ खेळाडू चाललाय मायदेशी

हैद्राबादचा आक्रमक खेळाडू आता मायदेशी परतणार आहे. त्यामुळे हैद्राबादला मोठा फटका बसणार आहे. या खेळाडूच्या जाण्याने हैद्राबादला मोठा फटका बसू शकतो.

Mumbai
Jonny Bairstow
जॉनी बेयरस्टो

सनरायझर्स हैद्राबादला मोठा फटका बसणार आहे. कारण, हैद्राबादचा सलामीवीर जॉनी बेयरस्टो २३ एप्रिलला आपल्या मायदेशी म्हणजे इग्लंडला परतणार आहे. त्यानंतर या मोसमातील एकही सामना खेळण्यासाठी बेयरस्टो येऊ शकणार नाही. रविवारी हैद्राबादचा कोलकाता सोबत सामना असणार आहे. त्यानंतर मंगळवारी हैद्रबादचा चेन्नई सोबत सामना खेळला जाणार आहे. हे दोन सामन्यांनंतर बेयरस्टो मायदेशी जाणार आहे.

बेयरस्टो का चाललाय मायदेशी?

इंग्लंड क्रिकेट बोर्डने(ईसीबी) विश्वचकाच्या पार्श्वभूमीवर सर्व खेळाडूंना २६ एप्रिलपर्यंत मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय इग्लंडची पाकिस्तान आणि आयर्लंडसोबत एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिका विश्वचषकाआधी खेळल्या जाणार आहेत. ईसीबीने पाकिस्तान सोबत खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी जॉनी बेयरस्टोची निवड केली आहे. त्यामुळे पाकिस्तान सोबतची मालिका खेळण्यासाठी २३ एप्रिलला बिअरस्टो इग्लंडला जाणार आहे.

जॉनी बेयरस्टोची कामगिरी

जॉनी बेयरस्टोची या हंगामात चांगली कामगिरी बघायला मिळाली. या मोसमातील तो टॉप फाईव्ह फलंदाजाच्या यादीत आहे. त्याने या मोसमात आतापर्यंत एकूण ३६५ धावा केल्या. या धावांचा स्ट्राईक रेट १५० आहे. या मोसमात सर्वाधिक फलंदाजी करणाऱ्या खेळाडूमध्ये त्याचा पाचवा क्रमांक लागतो. त्यामुळे बेयरस्टोच्या इंग्लंड जाण्याने हैद्राबादला मोठा फटका बसणार आहे.

पहिल्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकार हैद्राबाद

आयपीएलच्या १२ व्या मोसमात सुरुवातीला हैद्राबाद संघाबाबत प्रत्येक संघाच्या गोलंदाच्या मनात धासती निर्माण झाली होती. त्यामागील कारणही अगदी तसंच होतं. या मोसमात पहिला सामन्यात पराभव पत्कारल्यानंतर सलग तीन सामन्यांमध्ये हैद्राबादने विजय मिळवला होता. या तिन्ही सामन्यांमध्ये हैद्राबादची खेळी अत्यंत आक्रमक बघायला मिळाली होती. या खेळीला कारण होतं हैद्रबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो. या तिनही सामन्यांमध्ये दोघांनी १०० पेक्षा जास्त धावांती भागीदारी केली होती. त्यामुळे या आक्रमक सलामीवीरांबाबत इतर संघाच्या गोलंदाजांच्या मनात भिती निर्माण झाली होती. मात्र, स्पर्धा पुढे गेली तेव्हा हैद्राबाद संघातील कमतरत जाणवू लागली. सलामीवीरांची जोडी फुटल्यानंतर मधल्या फळीतील खेळाडूंकडून चांगली कामगिरी बघायली मिळाली नाही. त्यामुळे सलग तीन सामने जिंकल्या नंतर हैद्राबादला सलग तीन सामन्यांमध्ये पराभव झाला. त्यामुळे हैद्राबाद गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर फेकला गेला.