घरक्रीडाहैद्राबादचा कर्णधार केन विल्यम्सन परतला मायदेशी

हैद्राबादचा कर्णधार केन विल्यम्सन परतला मायदेशी

Subscribe

हैद्राबादचा कर्णधार केन विल्यम्सन मंगळवारी चेन्नई सोबत होणाऱ्या सामन्यामध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे या सामन्यासाठी संघाचं नेतृत्त्व भुवनेश्वर कुमारकडे सोपवण्यात आलं आहे.

सनरायजर्स हैद्राबादचा कर्णधार केन विल्यम्सन त्याच्या काही वैयक्तिक कारणा निमित्ताने मायदेशी परतला आहे. त्यामुळे मंगळवारी चेन्नई सोबत खेळल्या जाणाऱ्या सामन्यात केन विल्यम्सन खेळताना दिसणार नाही. केन विल्यम्सन हा एक अनुभवी कर्णधार आहे. तो न्युझीलंड क्रिकेट संघाचा देखील कर्णधार आहे. आगामी विश्वचषकासाठी न्युझीलंडने आपल्या संघाची घोषणा केली. या संघाच्या कर्णधार पदाची धूरा केन विल्यम्सनकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या कर्णधाराच्या नेतृत्त्वाची उणीव हैद्राबादला भासणार आहे.

भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्त्वात सामना रंगणार

केन विल्यम्सनला याअगोदर झालेल्या दुखापतीमुळे संघाचं नेतृत्त्व भुवनेश्वर कुमारला देण्यात आलं होतं. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सामन्याचे नेतृत्त्व देखील भुवनेश्वर कुमारवर सोपवण्यात आलं आहे. केन विल्यम्सन चेन्नई सोबत जरी खेळू शकणार नसला तरी यापुढच्या सर्व सामन्यांमध्ये तो खेळणार आहे. २७ एप्रिल रोजी हैद्राबादचा राजस्थान सोबत सामना होणार आहे. या सामन्यात केन विल्यम्सन पुन्हा कमबॅक करणार आहे.

- Advertisement -

जॉनी बियरस्टोचा शेवटचा सामना

जॉनी बियरस्टो हा हैद्राबाद संघाचा सलामीवीर आहे. बियरस्टो हा आक्रमक खेळाडू आहे. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बियरस्टो हे हैद्राबादचे प्रभावी खेळाडू आहेत. वॉर्नर-बियरस्टो जोडी ज्या सामन्यांमध्ये खेळले आहेत तो सामना हैद्राबादच्या संघाने जिंकला आहे. इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डने जॉनी बियरस्टोला पाकिस्तान आणि आयर्लंडच्या सिरीजसाठी मायदेशी परत येण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बियरस्टो आजच्या सामन्यानंतर या मोसमात खेळणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -