चेन्नईची विजयी घोडदौड सुरुच, ५ गडी राखत कोलकात्यावर मात

चेन्नईने ५ गडी राखत कोलकाताचा पराभव केला आहे. या सामन्यात चेन्नईचा फलंदाज सुरेश रैना चमकला आहे. त्याने जबरदस्त अर्धशतक करत चेन्नईला विजय मिळवून दिला आहे.

Chennai
suresh raina csk batsman
चेन्नईचा कोलकात्यावर विजय

गेल्या कित्येक दिवसांपासून सुरेश रैना फॉर्ममध्ये येताना दिसत नव्हता. मात्र, आज रैनाने जबदस्त खेळी करत कमबॅक केले आहे. सुरेश रैनाने नाबाद अर्धशतक करत करत चेन्नईला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे चेन्नईची विजयाची परंपरा कायम राहिली आहे. कोलकाताने चेन्नईपुढे १६२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाला सामोरे जाताना चेन्नईची सुरुवात वाईट झाली. चेन्नईचे आक्रमक फलंदाज शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायडू आणि केदार जाधव काही धावांच्या अंतरावर झटपट बाद झाले. परंतु, रैना आणि महेंद्रसिंह धोनीने भागिदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र, धोनीही बाद झाला. त्यानंतर रविंद्र जडेजाने रैनाला दिलेल्या साथीमुळे चेन्नईचा विजय झाला.

कोलकाता आणि चेन्नई यांच्यात आयपीएलच्या १२ हंगामातील २९ वा सामना खेळला गेला. हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर अर्थात ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या हंगामात कोलकाता आणि चेन्नई यांच्यात याअगोदरही एक सामना खेळला गेला होता. तो सामना अटीतटीचा ठरला होता. या अटीतटीच्या सामन्यात चेन्नईने कोलकाताला पराभूत केले होते.

प्रथम फलंदाजासाठी आसलेल्या कोलकाताची सुरवात फारशी बरी झाली नाही. सुनील नरिन आणि ख्रिस लीन या दोन्ही सलामीवीरांची चांगली भागीदारी झाली नाही. उंच फटका मारण्याच्या नादात सुनील नरिन लवकर झेलबाद झाला. तो फक्त २ धावा करु शकला. परंतु, ख्रिस लीनने आपल्या परिने आक्रमक खेळी सुरु ठेवली. त्याने ३६ चेडूंत अर्धतक केले. दरम्यान, नितीश राणाही बाद झाला. त्याने १८ चेंडूत २१ धावा केल्या. त्यानंतर उथप्पाही शून्यावरव बाद झाला. सलामीवीर ख्रिसही ८२ धावांवर बाद झाला. कोलकाताचा आंद्रे रसेलही फार काही करु शकला नाही. त्याने ४ चेंडूत १० धावा केल्या. त्यानंतर दिनेश कार्तिकही स्वस्तात तंबूत परतला. कोलकाताची २० षटकांत ६ बाद १६१ धावा केल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here