घरIPL 2020SRH vs RR: हैदराबादचा राजस्थानवर ८ गडी राखून दणदणीत विजय

SRH vs RR: हैदराबादचा राजस्थानवर ८ गडी राखून दणदणीत विजय

Subscribe

मनिष पांडे आणि विजय शंकर या जोडीने केलेल्या संयमी भागीदारीच्या जोरावर सनराईजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ८ गडी राखून पराभव केला. राजस्थानने हैदराबादला १५५ धावांचं उद्दिष्ट दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादला जोफ्रा आर्चरने दणके दिले. मनिष पांडे आणि विजय शंकर या जोडीने संघाला सावरत विजय मिळवून दिला.

राजस्थानच्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. सलामीवीर वॉर्नर आणि बेअरस्टो जोडी स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर मनीष पांडे आणि विजय शंकर या दोघांनी संयमी खेळ करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. मनीष पांडेने ४७ चेंडूत ८३ धावा केल्या. यामध्ये ४ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे. पांडेला विजय शंकरने चांगली साथ दिली. विजय शंकरने ५१ चेंडूत ५२ धावा केल्या. यामध्ये ६ चौकरांचा समावेश आहे. पांडे-शंकर या जोडीने सावध फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने २ गडी बाद केले.

- Advertisement -

नाणेफेक जिंकून सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत राजस्थनला प्रथम फलंदाजीला बोलावलं. राजस्थाकडून सलामीवर रॉबिन उथप्पा आणि बेन स्टोक्स चांगली सुरुवात करून देत आहेत असं वाटतानाच उथप्पा बाद झाला. यानंतर संजू सॅमसन आणि स्टोक्स यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. सॅमसनचा झंझावात या सामन्यात पाहायला मिळेल असं वाटत असतानाच जेसन होल्डरने सॅमसनला त्रिफळाचीत करुन हैदराबादला दुसरं यश मिळवून दिलं. यानंतर लागोपाठ बेन स्टोक्सही राशिद खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. राजस्थानने ६ गड्यांच्या मोबदल्यात १५४ धावा करत १५५ धावांचं आव्हान दिलं. हैदराबादकडून जेसन होल्डरने ३, विजय शंकर आणि राशिद खान यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -