चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स प्रीव्ह्यू 

आज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना होणार आहे. चेन्नईचा हा यंदाच्या मोसमातील तिसरा सामना असेल. त्यांनी मुंबईचा पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली होती, पण राजस्थानविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचा पुनरागमनाचा प्रयत्न असेल. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने आपल्या पहिल्या सामन्यात पंजाबचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांचे सलग दुसरा विजय मिळवण्याचे लक्ष्य असेल. हे दोन संघ आजच्या सामन्यात कसा खेळ करू शकतील यावर केलेली चर्चा.