IPL 2020 मध्ये चीअर लीडर्स दिसणार, पण

cheerleders in ipl 2020
Advertisement

Indian Premier League अर्थात IPL 2020 ची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. विशेषत: कोरोनाच्या जागतिक संकटकाळात लॉकडाऊन आणि एकत्र येण्याचे निर्बंध लागू असताना आयपीएलची स्पर्धा कशी होणार आणि सामने कसे खेळवले जाणार? याविषयी क्रिकेट चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर येत्या १९ सप्टेंबरपासून UAE मध्ये आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. सलामीचा सामनाच CSK Vs MI यांच्यात अबुधाबी येथे होणार आहे. मात्र, या सामन्यामध्ये कोरोनामुळे असणारे सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू असणार आहेत. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी नसल्यामुळे सर्व स्टॅण्ड रिकामेच असणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रतिसादाशिवाय खेळाडू कसे खेळणार? यावर चर्चा सुरू असताना सामन्यादरम्यान चीअरलीडर्स नाचताना दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण त्यासाठी एक अट असणार आहे!

शारजाहमध्येही होणार सामने

आयपीएलच्या सामन्यादरम्यान सामान्य परिस्थितीमध्ये हजारोंच्या संख्येने प्रेक्षक, चौकार-षटकार किंवा विकेटनंतर सीमारेषेवर उभ्या असणाऱ्या नाचणाऱ्या चीअर लीडर्स (Cheer Leaders) आणि खेळाडूंचा जल्लोष असा सगळा माहौल असतो. मात्र, यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये भारतामध्ये IPL न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याऐवजी आयपीएल UAE मध्ये भरवण्यात येणार असून फक्त तीनच ठिकाणी आयपीएलचे सगळे सामने होणार आहेत. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे अनेक वर्षांपूर्वी क्रिकेट बंद करण्यात आलेल्या शारजाहमध्ये देखील यंदाच्या आयपीएलचे सामने होणार आहेत. त्यासोबतच सामन्यांसाठीच्या अटींमध्ये चीअरलीडर्सला बंदी घालण्यात आली होती. मात्र, यावर देखील टीम फ्रॅन्चायजींनी भन्नाट कल्पना शोधून काढली आहे!

हे कसं शक्य आहे?

यंदाच्या वर्षी तैवानमध्ये झालेल्या स्पॅनिश लीग ला लिगामध्ये मैदानात एकही प्रेक्षक उपस्थित नव्हता. मात्र, टीव्हीवर व्हर्च्युअल प्रेक्षक उपस्थित होते. अर्थात गोल झाल्यावर प्रेक्षकांच्या घोषणांचे आवाज आधीच रेकॉर्ड करून ठेवले होते. प्रेक्षकांचे कटआऊट्स ठेवण्यात आले होते. प्रेक्षकांच्या जागी रोबोट्स ठेवण्यात आले होते. आयपीएलमध्ये देखील आता चीअरलीडर्ससाठी असंच काहीसं केलं जाणार आहे. चौकार, षटकार आणि विकेटनंतर होणारा चीअरलीडर्सचा डान्स आधीच शूट करून ठेवला जाणार आहे. त्यामुळे मैदानात असं काही घडलं की सीमारेषेवर उभ्या करण्यात आलेल्या मोठाल्या स्क्रीन्सवर चीअरलीडर्स आणि प्रेक्षक जल्लोष करताना खेळाडूंना दिसू शकणार आहेत. यामुळे खेळाडूंचं प्रोत्साहन वाढेल, असं म्हटलं जात आहे.


IPL 2020 Timetable – स्पर्धेचं वेळापत्रक पाहण्यासाठी क्लिक करा!