घरIPL 2020DC vs KXIP: पूरनची गेम चेंजिंग खेळी; पंजाबचा दिल्लीवर विजय

DC vs KXIP: पूरनची गेम चेंजिंग खेळी; पंजाबचा दिल्लीवर विजय

Subscribe

किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलं आहे. पूरनच्या फलंदाजीच्या जोरावर पंजाबने दिल्लीला ५ गडी राखून पराभव केला. दिल्लीच्या १६५ धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. मात्र गेलची ताबडतोड फटकेबाजी आणि पूरनच्या जोरावर ५ गड्यांच्या मोबदल्यात १६७ धावा करत हा सामना जिंकला.

दिल्लीच्या १६५ धावांचा पाठलाफ करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला पंजाबचा कर्णधार केएल राहुल जोराचा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. यानंतर ख्रिस गेलने देशपांडेच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत एका षटकात २६ झोडपल्या. गेल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असताना अश्विनला जोराचा फटका मारण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. गेलने १३ चेंडूत २९ धावा केल्या. यानंतर मयांक अगरवाल चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. त्यानंतर निकोलस पूरनने जोरदार फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ नेलं. पूरनने मॅक्सवेलसोबत चांगली भागीदारी करत संघाला सुस्थितीत आणलं. पूरनने २८ चेंडूत ५३ धावा केल्या. यामध्ये ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. पूरन बाद झाल्या नंतर मॅक्सवेलने संघाची जबाबदारी घेत संघाला अजून विजयाच्या जवळ नेलं. मॅक्सवेलने २४ चेंडूत ३२ धावा केल्या. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर दीपक हुड्डा आणि निशमने संघाला विजय मिळवून दिला.

- Advertisement -

पंजाबविरूद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची खराब सुरुवात झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ स्वस्तात बाद झाला. यानंतर शिखर धवनने कर्णधार श्रेयस अय्यर सोबत भागीदारी करत संघाला सावरलं. ही जोडी मैदानावर स्थिरावते की काय असं वाटत असताना मुरुगन अश्विनने अय्यरला बाद करत ही जोडी फोडली. अय्यरने १२ चेंडूत केवळ १४ धावा केल्या. यानंतर पंत, स्टॉयनीस आणि हेटमायर स्वस्तात बाद झाले. धवनने एका बाजूने तळ ठोकत संघाला १६० च्या पार नेलं. या सामन्यात शिखरने मोसमातील सलग दुसरं शतक ठोकत विक्रम रचला. धवनने ६१ चेंडूत १०६ धावा केल्या. यामध्ये १२ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. पंजाबकडून शमीने २ आणि मॅक्सवेल, निशम आणि मुरुगन अश्विनने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -