IPL 2020: कुणाचा बाप हमाल, कुणी पाणीपुरीवाला; कष्टकऱ्यांच्या पोरांना IPL ने बनवलं हिरो

ipl 2020 ipl makes these players not only star also crorepati

जगातील सर्वात मोठी टी-२० क्रिकेट स्पर्धा IPL कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूएईमध्ये सुरू आहे. IPL ही श्रीमंत स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेने अनेक खेळाडूंना जे गरिब परिस्थितीत क्रिकेट खेळलं आहे त्यांना स्टार बनण्याची संधी दिली. IPL मुळे आज या खेळाडूंकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. यामध्ये रवींद्र जडेजा, यशस्वी जयस्वाल, नटराजन आणि मोहम्मद सिराज असे खेळाडू आहेत. या खेळाडूंच्या पालकांनी मोलमजूरी करुन या मुलांना मोठं केलं अशा या खेळाडूंची माहिती जाणून घेऊया.

यशस्वी जयस्वाल

यशस्वी जयस्वाल हे नवं नाव आहे. आयपीएलच्या १३ व्या मोसमाच्या लिलावात यशस्वी जयस्वालला राजस्थान रॉयल्सने २.४० कोटींमध्ये विकत घेतलं. यशवी जयस्वालचे वडील आणि तो पाणीपुरी विकायचा. मात्र, IPL मुळे त्याचं जीवन बदललं आहे.

टी. नटराजन

तमिळनाडूमधील टी. नटराजनची आई आधी रस्त्याच्या कडेला एक स्टॉल लावायची, तर त्याचे वडील रेल्वे स्थानकात कुली म्हणून काम करत असत. नटराजनने टेनिस बॉल क्रिकेटने आपल्या प्रवासाची सुरूवात केली. त्याच्या कठोर परिश्रमाने त्याला आयपीएलमध्ये खेळायची संधी मिळाली आहे. २०१७ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला ३ कोटींमध्ये विकत घेतलं. सध्या नटराजन सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे.

मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराज याचे वडील ऑटो चालवत असत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्याला आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादनेही २.६ कोटीमध्ये खरेदी केलं होतं. सध्या तो आरसीबीमधून खेळत आहे.

रवींद्र जडेजा

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा याच्या आयुष्यात देखील अनेक संकटं आली. जडेजाचे वडील एका खासगी कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकाचं काम करत होते. १० रुपयात पूर्ण दिवस घालवायचो, असं स्वत: जडेजाने सांगितलं आहे. जडेजा कोची टस्कर आणि गुजरात लायन्सकडूनही खेळला आहे. जडेजा आता चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. चेन्नईने त्याला ७ कोटीमध्ये संघात घेतलं आहे.